Ramdas Athawale: "महाराष्ट्रात आम्हाला दोन जागांची अपेक्षा, पण नाही मिळाल्या तर, आम्ही NDA मध्ये..."; रामदास आठवलेंची स्पष्ट भूमिका
Ramdas Athawale: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं की, त्यांचा पक्ष शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
Ramdas Athawale on Lok Sabha Election 2024 : नागपूर : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) वंचितला वंचित (Vanchit Bahujan Aaghadi) ठेवण्याचा प्रयत्न सुरूये, आरपीआय नेते (RPI Leaders) रामदास आठवलेंची (Ramdas Athawale) महाविकास आघाडीवर टीका केली आहे. वंचितनं महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये, असा सल्लाही रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. तसेच, आगामी लोकसभांबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महाराष्ट्रात दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे. पण जर तसं झालं नाही तरी मी त्यांची साथ सोडणार नाही, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
"वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा प्रयत्न"
रामदास आठवले बोलताना म्हणाले की, "वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. वंचित महाविकास आघाडीसोबत इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे. त्यांचा अपमान होत आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. त्यांना सन्मानजनक जागा मिळत असतील, तरच त्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही. पण ते जातील असं वाटत नाहीये."
मी NDA मध्ये आहे, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान दिलं. एकही जागा नाही मिळाल्यानं मी त्यांना सोडणार नाही, लगेच सोडण्याचा विचार होत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
राहुल गांधी चैत्यभूमीवर आले, त्यासाठी आभार : रामदास आठवले
"चैत्यभूमीवर जाऊन राहुल गांधी आले, त्यासाठी त्यांचे आभार आहे. ज्या रोडला महाविकास राहुल गांधीच्या गर्दी मतांमध्ये परिवर्तन होत नाही. राहुल गांधी हे गावात आलं म्हणून त्यांना बघण्यासाठी जातात. त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या पण मतांमध्ये रूपांतर होत नव्हतं. सभा मोठी असली तरी त्यांना फार यश मिळेल, असं वाटत नाही.", असं रामदास आठवले म्हणाले.
अजितदादांचा विस्तार झाला, मात्र आमचा विकास होऊ शकला नाही : रामदास आठवले
"महाविकास आघाडीला 400 पेक्षा जास्त मेघा मेघडणार आहे. रिपब्लिकन NDA मध्ये असल्यामुळे आम्हाला सोलापूर आणि शिर्डीच्या जागा मिळावी अशी मागणी आहे. रिपब्लिकन छोटा पक्ष असला तरी, भाजप नेत्यांना भेटलो आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा सोबत आहे. शिंदे गटाचे तिथे खासदार आहेत, मला संधी दिली तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये फायदा होईल. महाराष्ट्रातील सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळाला नाही. अजितदादांचा विस्तार झाला, मात्र आमचा विकास होऊ शकला नाही, त्यामुळे या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद द्यावं", अशी इच्छा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे.