एक्स्प्लोर

Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'

Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Ram Kadam on Raj Thackeray: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पावर झालेल्या दरड कोसळीच्या दुर्घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या हिंदीतील भाषणावर आणि 'बघून घेऊ' या इशाऱ्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. राज ठाकरेंच्या याच टीकेला आता भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ram Kadam on Raj Thackeray: नेमकं काय म्हणाले राम कदम?

राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप आमदार राम कदम म्हणाले की, "अमीर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण मराठी किती बोललात, मग मुख्यमंत्री यांनी भाषणात दोन ओळी हिंदीत बोललं तर काय झालं. मराठीचा आदर कायमचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची ओळखचं इन्फ्रा मॅन अशी झाली आहे. धडाधड सर्वत्र कामं सुरू आहेत याची धास्ती विरोधकांना आहे. त्यामुळेच विरोधकांकडून टक्केवारीच्या गोष्टी करून बदनाम केलं जात आहे. रामाच्या अस्तित्वावर कायम प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले त्यांचा तो अजेंडा होता. मिसिंग लिंकवरची दरड हा अपघात होता. लोकं चांगल्या कामाबद्दल बोलत नाही.मात्र, त्रुटींबाबत कायम बोलतात," अशी टीका त्यांनी केलीय.

Raj Thackeray on Devendra Fadnavis: "विधानसभा महाराष्ट्राची अन् मुख्यमंत्री हिंदीत कशासाठी बोलतात?: राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागताना विधानसभेतील त्यांच्या भाषेवर बोट ठेवले होते. राज ठाकरे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत भाषण झालं. मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे वैगरे बोलले, टीका करणाऱ्यांना बघून घेऊ म्हणतात, मुख्यमंत्री आहे ना तू? मग हिंदीमधून सुरू झाले, कोणासाठी हिंदी बोलला? विधानसभा महाराष्ट्राची. कदाचित आपल्याच पक्षातील वरच्यांना सांगायचे आहे बघून घेईन," अशी टीका त्यांनी केली होती. 

फडणवीसांच्या 'राजकारण करू नका' या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे पुढे म्हणाले, "वा रे वा, त्याचं राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण? आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय. एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकारविरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जातं, मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का?," असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा 

Raj Thackeray on Missing Link: मिसिंग लिंकवरुन प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला, लोकांनी प्रश्नही विचारायचे नाहीत का? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget