एक्स्प्लोर

Raj Thackeray on Missing Link: मिसिंग लिंकवरुन प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला, लोकांनी प्रश्नही विचारायचे नाहीत का? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Raj Thackeray on Missing Link: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर पहिल्याच पावसा खड्डे पडल्याने आणि दरड कोसळल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्यावरुन देवेंद्र फडणवीस संतापले होते

Raj Thackeray on Missing Link: देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेतील भाषणात मिसिंग लिंकवरुन राजकारण करु नका असे सांगितले. वा रे वा, त्याचं राजकारण करु नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण, आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वत:च्या अंगाशी  आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते गुरुवारी मुंबईतील मनसे (MNS) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मिसिंग लिंकच्या (Connecting link) दुर्घटनेवरुन राजकारण करुन महाराष्ट्राचा अपमान करु नका, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समाचार घेतला. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री विधानसभेत काय बोलतात,'एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकारविरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जातं, मिसिंग लिंकबद्दल (Missing link) बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. आता सरकारला ज्या शिव्या घातल्या आहेत, ते गेली अनेक वर्षे तुमच्याकडूनच सुरु होते. विरोधकांना वाटेल ते बोल, शिव्या घाल, हे तुमच्याकडूनच सुरु होते. आता या गोष्टी अंगलट येऊ लागल्यावर  आणि सगळं अंगावर आल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला आहे. पण या सगळ्या गोष्टी आपणच सुरु केल्या होत्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की, मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे बांधकाम आहे. यावरुन राजकारण करणाऱ्यांना बघून घेऊ. अरे तू मुख्यमंत्री आहेस ना, बघून घेऊ काय? हे सगळे बोलल्यानंतर मुख्यमंत्री अचानक हिंदीतून बोलायला लागले. ते कोणासाठी हिंदीत बोलत होते, समोरचे आमदार मराठी, विधानसभा महाराष्ट्राची आणि आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. हे कशासाठी आणि कोणासाठी होतं? कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल, तुम्हाला बघून घेईन. त्यांनाही माहिती आहे, हे सगळे व्हिडीओ कुठून येत आहेत? भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर घमासान सुरु आहे, फक्त पाहत राहा आगामी काळात काय होते?, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray: विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचा विचका केलाय: राज ठाकरे

मुंबई, महाराष्ट्र आणि ठाण्यात विचका झाला आहे, त्याला हे सरकार विकास बोलत आहे. बघावं तिकडे इमारती सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी सगळी बांधकामं बंद करुन टाकावीत. नुसते रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे म्हणजे विकास नव्हते. हे लोक परदेशात जाऊन काय शिकून येतात, हेच मला समजत नाही. मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 मे रोजी झाले.  आता जुलै महिन्यात त्यामधून पाणी वाहतंय, 60-65 दिवसांत नवा टनेल गळायला लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनावेळी मिसिंग लिंकसाठी सामान वेगवेगळ्या देशातून आणलं आहे, हे सांगत होते. पण हे सगळं भारतीय कंत्राटदाराकडे दिलं की, ते करायचं तेच करतात. काही कंत्राटदार सांगत आहेत की, त्यांना मिळणाऱ्या कंत्राटातील 56 टक्के पैसे सरकारमधील लोकांना द्यावे लागतात. मग त्यांना 44 टक्क्यात काम करावे लागते, मग तुम्हाला असेच रस्ते मिळणार ना?, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget