बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो, आता बँकेला सरकारने 300 कोटी दिले; आमदार राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य
Rajendra Shingne on Ajit Pawar : "मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील"
Rajendra Shingne on Ajit Pawar : "मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील", अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. ते वर्धा येथे बोलत होते.
मागील दोन अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही
राजेंद्र शिंगणे म्हणाले, सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत होतो, त्यामुळे मी आलो. आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झाली नाही. मी जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही. आजही मी त्यांना नेता मानतो. मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पावरांचं नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे.
भविष्यात सुद्धा पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार
पुढे बोलताना राजेंद्र शिंगणे म्हणाले, भविष्यात सुद्धा पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे. मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो. खर म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. जवळपास तीस वर्ष झाले आहे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ्या राजकीय जडणघडणी मध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे, असंही शिंगणे म्हणाले.
राजेंद्र शिंगणे सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार
राजेंद्र शिंगणे हे सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2023 मध्ये अजित पवारांनी बंड करत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अडचणींमुळे लोक महायुतीसोबत गेले, असा आरोप करत होते. राजेंद्र शिंगणे यांना आरोपांना अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली आहे. त्यामुळे राजेंद्र शिंगणे पुढील काळात कोणता निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपला 95 ते 105 जागा, उद्धव ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज; टाईम्स-MATRIZE सर्व्हेने कुणाकुणाची धाकधूक वाढणार?