Rajasthan Politics : राजस्थानमध्ये तात्काळ मुख्यमंत्री बदला, सचिन पायलट यांची मागणी
Rajasthan Assembly Election 2023: विधानसभा 2023 च्या निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.
Rajasthan Assembly Election 2023: विधानसभा 2023 च्या निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सचिन पायलट यांनी यापूर्वी गांधी परिवारासोबत तीन वेळा भेटी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावेळी पायलट यांनी काँग्रेस हायकमांडला सांगितले की, राजस्थानमध्ये तात्काळ मुख्यमंत्री बदला, अन्यथा राजस्थानमध्ये पंजाबसारखी परिस्थिती निर्माण होईल.
अलीकडेच सचिन पायलट यांनी नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. राजस्थानमध्ये काँग्रेसला पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर मुख्यमंत्री बदलावा, असे सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सोनिया गांधींना सांगितल्याचे बोलले जात आहे. एनडीटीव्हीनुसार, 10 जनपथ येथे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या भेटीदरम्यान सचिन पायलट म्हणाले की, राजस्थानमधील मुख्यमंत्री लवकर बदलले नाहीत तर सत्तेत परतणे कठीण आहे. पायलट पुढे म्हणाले की, पंजाबमध्ये शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री बदलण्यात आले, त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. तत्पूर्वी पायलट यांच्याआधी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना नवी दिल्लीत भेटीसाठी बोलावले होते. त्याचवेळी, पाच दिवसांपूर्वी जयपूरमधील एका कार्यक्रमात गेहलोत म्हणाले होते की, माझा राजीनामा कायमस्वरूपी सोनिया गांधींकडे ठेवण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये 2023 च्या अखेरीस निवडणुका
राजस्थान विधानसभा निवडणुका 2023 च्या अखेरीस होणार आहेत. काँग्रेस हायकमांडचे लक्ष राजस्थानवर आहे. सचिन पायलटने 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. पायलट यांच्या भेटीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्यानंतर पायलट यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, सोनिया गांधींना राजस्थान काँग्रेसमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. 2023 च्या निवडणुकीत पक्ष पुन्हा एकदा जिंकेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू
- Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाच्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील बंदीचा परिणाम, देशात पामतेलाचे दर कडाडले