एक्स्प्लोर

Sindhudurg Politics: राजन तेलींची भाजपमधून हाकालपट्टी करा, केसरकरांची मागणी; तळकोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी

Sindhudurg Politics: तळकोकणात मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राजन तेली यांच्यावर निशाणा साधत दीपक केसरकरांनी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Sindhudurg Politics: सिंधुदुर्ग : तळकोकणात महायुतीमध्ये (Mahayuti) वादाची ठिणगी पडली असून सध्या हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांच्यात विस्तव विजता विजत नाही आहे. अशातच आता मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनं पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील (Sindhudurg News) राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच, आम्ही महायुतीत आलो, त्यामुळेच हे सरकार स्थापन झालं, असंही दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना सुनावलं आहे. 

तळकोकणात मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राजन तेली यांच्यावर निशाणा साधत दीपक केसरकरांनी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यावेळी दीपक केसरकर संतप्त होऊन आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून हे सरकार स्थापन झालं, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे? त्यांना आमदार व्हायचंय म्हणून ते पातळी सोडून टीका करतात. महायुती अडचणीत असताना चुकीची वक्तव्य कुणी करू नये, असंही म्हणतात. 

मंत्री दीपक केसरकरांच्या टीकेला भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी पलटवार केला आहे. तुम्ही ज्या-ज्या वेळी माझी तक्रार केली. त्या-त्या वेळी पक्षानं मला बढती दिली आहे. त्यामुळे तुम्ही माझी तक्रार कराच, असं खुलं आव्हान राजन तेली यांनी दीपक केसरकरांना दिलं आहे. दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगत राजन तेली यांनी दिपक केसरकर यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद विकोपाला पोहोचला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात महायुतीत सध्या सारं काही आलबेल नसल्याचंच चित्र आहे. 

दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा

दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याच्या चर्चांनी सिंधुदुर्गात जोर धरला आहे. भाजपकडून राजन तेली विधानसभेसाठी इच्छुक असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, असा ठरावच भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडला आहे. या बैठकीला राजन तेली यांच्यासह जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी  माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक उपस्थित होते. 

दरम्यान, नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली आहे, सिंधुदुर्गात भाजपला जनतेने कौल दिला आणि नारायण राणे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले आहेत. आता लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभेसाठी भाजप सावंतवाडी मतदारसंघावर दावा करताना दिसत आहे. माजी आमदार राजन तेली यांनी दोन वेळा सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. मात्र आता सावंतवाडी विधानसभा भाजपला मिळावी यासाठी राजन तेली यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saroj Ahire NCP Nashik : शिवसेनेच्या उमेदवाराला थांबवलं जाईल अशी प्राथमिक माहिती -सरोज अहिरेCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 9 नोव्हेंबर 2024 :  ABP MajhaPoonam Mahajan on Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे : पूनम महाजनTISC Report :  बांगलादेशी, रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Embed widget