Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो : राज ठाकरे
Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: संपूर्ण ठाकरे कुुटंब एकाच फ्रेममध्ये, व्यासपीठावर राज, उद्धव यांच्यासह रश्मी, शर्मिला, आदित्य, अमित, तेजस यांचं एकत्र फोटोसेशन...
LIVE

Background
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. तब्बल 18 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एका व्यासपीठावर आले. वरळी डोम इथे झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतली. एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ती ठाकरेंच्या मनोमिलनाची... राज - उद्धव या ठाकरे बंधूंच्या पुढच्या पिढीने म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत, एकत्र दिलेली पोझ लक्षवेधी होती. दोघांना एकत्र आणण्यासाठी बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असा टोला राज ठाकरेंनी भाषणातून मारला, तर आमच्यातला 'अंतर'पाट अनाजीपंतांनी दूर केला, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अभूतपूर्व गर्दी झालेला, राजकारणाची पुढची दिशा बदलण्याची ताकद असलेला हा मेळावा ठाकरे ब्रँडची ताकद राजकारणाला दाखवून गेला.
संपूर्ण ठाकरे कुुटंब एकाच फ्रेममध्ये... व्यासपीठावर राज, उद्धव यांच्यासह रश्मी, शर्मिला, आदित्य, अमित, तेजस यांचं एकत्र फोटोसेशन... आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष... दोघांची व्यासपीठावर एकत्र एण्ट्री...एकमेकांना मारली मिठी...
मराठीवरुन उठसूठ मारामारी करायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे : राज ठाकरे
मराठीवरुन उठसूठ मारामारी करायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, राज ठाकरेंचा इशारा... मारल्याचे व्हिडीओ काढू नका असाही सल्ला...
आमचा म केवळ महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा आहे; उद्धव ठाकरेंनी दिले राज ठाकरेंसोबत विधानसभा निवडणुकीतही एकत्र येण्याचे संकेत
आमचा म केवळ महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा आहे, उद्धव ठाकरेंनी दिले राज ठाकरेंसोबत विधानसभा निवडणुकीतही एकत्र येण्याचे संकेत.. एकमेकांत भांडण्याचा नतद्रष्टपणा करायचा नाही, असा सल्ला...
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो : राज ठाकरे
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE: विजयी मेळावा संपल्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो."
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Video: न भूतो न भविष्यती असा ग्रँड सोहळा आज मुंबईतील (Mumbai) वरळी डोम येथे पार पडला. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र आले नाही, तर ठाकरे कुटुंबीय एकत्र पाहायला मिळाले. ठाकरेंची चौथी पिढीही व्यासपीठावर एकत्र दिसून आली, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चुलत भाऊ देखील मराठीच्या मुद्द्यावरुन आयोजित विजय जल्लोष मेळाव्यासाठी एकत्र आले. यावेळी, दोन भावांना जवळ घेऊन फॅमिली फोटो फ्रेम देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुप्रिया सुळे आत्याबाईंच्या भूमिकेत दिसले, ज्यांनी दोन्ही भाच्यांना हाताला धरुन एकमेकांना जवळ आणलं.























