एक्स्प्लोर

Raj Uddhav Thackeray alliance: शिवसेना-मनसे युतीची घोषणा होताच राज ठाकरेंचा जुना मावळा रस्त्यावर उतरला, वसंत मोरेंनी कात्रज चौकात काय केलं?

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये शिवसेना-मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईच्या वरळी येथील पत्रकारपरिषदेत मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि मनसेच्या (MNS) युतीची घोषणा केली. यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकच जल्लोष केला. राज आणि उद्धव (Uddhav Thackeray) हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज-उद्धव (Raj Uddhav Alliance) यांच्या अधिकृत युतीच्या घोषणेनंतर आनंद साजरा केला. या आनंदात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि कट्टर राज ठाकरे (Raj Thackeray) समर्थक वसंत मोरे (Vasant More) हेदेखील सामील झाले होते. वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज चौकात रस्त्यावर लाडू वाटून हा क्षण साजरा केला. (Pune Mahangarpalika Election 2026)

विशेष म्हणजे वसंत मोरे ज्याठिकाणी लाडू वाटत होते तिथूनच काही अंतरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही राज-उद्धव युतीच्या घोषणेचा आनंद साजरा करत होते. मात्र, वसंत मोरे त्यांच्यासोबत सहभागी न होता स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर फिरुन लाडू वाटत होते. यावेळी त्यांनी 'उद्धव साहेब आगे बढो, राज साहेब आगे बढो', अशा घोषणाही दिल्या. वसंत मोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वसंत मोरे हे एकेकाळी पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा होते. पुण्यात मनसे असं नाव घेतलं की लोकांच्या तोंडी आपोआप वसंत मोरेंचे नाव यायचे. मनसेची खळखट्याक शैली आणि वसंत मोरे यांचे आक्रमक नेतृत्व या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक होत्या. मात्र, मशि‍दींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवण्याचा राज ठाकरे यांचा आदेश मानण्यास वसंत मोरे यांनी नकार दिला होता. माझ्या मतदारसंघातील अनेक मतदार मुस्लीम आहेत. त्यांनी इतकी वर्षे मला साथ दिली आहे, त्यांच्याविरोधात मी कसा आंदोलन करु, असा सवाल विचारत वसंत मोरे यांनी राजादेश मानण्यास नकार दिला होता. त्यानंतर वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यातील अंतर वाढत गेले. दरम्यानच्या काळात त्यांचे पुण्यातील मनसे नेत्यांशीही बिनसले. अखेर 2024 मध्ये वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता शिवसेना आणि मनसेची युती झाल्याने वसंत मोरे यांची काहीशी गोची होण्याची शक्यता आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडताना पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी प्रचंड बिनसले होते. परंतु, आता शिवसेना-मनसे युतीमुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वसंत मोरे यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

आणखी वाचा

ठाकरेंच्या युतीच्या घोषणावेळी संजय राऊतांना खास खुर्ची, मग बाळा नांदगावकर कुठे होते? मोठी माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget