युतीच्या प्रश्नावर राज ठाकरे भडकले, म्हणाले, जे बोललो ते बोललो, आता माघार नाही, मनसे सर्वाधिक जागा लढवणार!
मी विधानसभा निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत मी बोललो, सहज म्हणून नाही बोललो, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) स्वबळावरच लढण्यावर मनसे ठाम आहे. निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केल आहे. लवकरच राज्याचा दौरा आणि जाहीरनाम्याचंही प्रकाशन करणार असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. तसेच टोलमाफी करण्याची मागणी आमचीच होती. राज ठाकरेंनी टोलमाफी केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तसेच मी निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार, असेही राज ठाकरे म्हणाले.
मी विधानसभा निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत मी बोललो, सहज म्हणून नाही बोललो. सहकाऱ्यांचा उत्साह यावा यासाठी नाही बोललो. विधानसभा निवडणूका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच महयुतीच्या प्रस्तावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जर - तर वर चर्चा करत नाही. मी माझ्या सभेत बोललो ते बोललो आहे.
टोलमाफी केल्याबद्दल सरकारचे आभार: राज ठाकरे
राज्य सरकारने मुंबईतील पाच टोल नाक्यावर टोलमाफी केली आहे.याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, टोलमाफीची मागणी आमचीच होती . काँग्रेस सरकार होतं तेव्हापासून आमची होती. आपली फसवणूक होते हे लोकांना वाटतं होतं सरकारचे मी आभार मानेल. निवडणुकीच्या तोंडावर हे झालेलं आहे. मत पाहिजे म्हणून टोल बंद केले, असं होणार नाही असं होऊ देणार नाही. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. अनेकांनी टोल नाके बंद करू असे शब्द दिले. निर्णय घेतला याचं समाधान आहे. पण पैसे कुठून येतायत हे माहीत नाही. कोणाच्या खिशात किती गेले याचा अंदाज नव्हते. आता श्रेय घेण्यासाठी सगळे येतील . राज ठाकरेंनी एखादं आंदोलन पुढे नेलं की असंच होणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
... तर राज्य कंगाल होईल : राज ठाकरे
लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे म्हणाले, सरकारकडे आज पैसे नाही. तुम्ही वाटावाटी करत आहात. असे केल्यास राज्य कंगाल होईल.
Raj Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2024 Video :विधानसभा लढवणार,जिंकणार अन् सत्ता आणणार; राज ठाकरे गरजले
हे ही वाचा :
लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र