MNS : मराठी गया तेल लगाने, मनसैनिकांची ठाण्यातील बँकेत धडक, मुजोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला तेल लावून चोपलं!
MNS : राज ठाकरे यांनी बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्यानंतर मनसैनिक अलर्ट मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

MNS : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava 2025) मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये (Bank) जाऊन मराठी कारभार होत आहे का? हे बघा नसेल तर त्यांना करायला लावा, दिला होता. राज ठाकरे यांनी बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत असे सांगितल्यावर मनसे अलर्ट मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देत बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणे अनिवार्य असल्याची मागणी केली आहे. तर "मराठी गया तेल लगाने, असे म्हणणाऱ्या मुजोर सुरक्षारक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाप्रसाद' दिलाय.
पवईतील L&T च्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत काही कारणामुळे वाद झाला होता. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र हा सुरक्षा रक्षक उत्तरेकडील असल्यामुळे त्याला मराठी बोलता येत नव्हते. याशिवाय मराठी येत नसल्याचे छातीठोकपणे तो सुरक्षा रक्षक सांगत होता. मराठी गया तेल लगाने, असे देखील या सुरक्षा रक्षकाने म्हटले. या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच अद्दल घडवली.
मराठीचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही
मनसैनिकांनी त्याला चांगलीच समज दिली. आधी त्याला कानशिलात लगावली आणि मराठीचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मनसैनिकांकडून नेहमीच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जातो. यंदाही पवईमधील L&T मध्ये 'मराठी गया तेल लगाने' म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावण्यात आली. मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं. 'मराठी गया तेल लगाने' असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिकांनी यावेळी सांगितलं. मराठी येत नसेल तर ती भाषा शिका. मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही, असंही मनसैनिकांनी म्हटले आहे.
काय म्हणाले अविनाश जाधव?
दरम्यान, ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देत बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणे अनिवार्य असल्याची मागणी केली आहे. याबाबत मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आज बँकेला निवेदन देत ताकीद दिली आहे, उद्यापासून सर्व बोर्ड मराठीत असले पाहिजे. स्टाफ देखील मराठी माणसं असली पाहिजेत. बोलणारी माणसे देखील मराठीच असली पाहिजेत. बदल दिसला नाही तर मनसेला सामोरे जावे लागणार आहे. आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो. मात्र, आज काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खाजगी बँकांना निवेदन देणार आहे. मराठीत कारभार झाला नाही तर बँकेत सर्व बॅनर्स आम्ही स्वखर्चाने लावणार आहोत. मराठी व्यवहार झाला नाही आणि बॅनर जर लावले नाही तर फुकट मार खाल. मराठी माणसाबाबत मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील. पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकात आमचे निवेदन जाणार आहे. आम्हाला बदल हवाय, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा























