एक्स्प्लोर

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात: प्रकाश आंबडेकर

प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात, राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला.

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत (ABP Majha Tondi Pariksha) अनेक राजकीय अंदाज बांधताना, गौप्यस्फोटांची मालिकाही केली. सध्याची राजकीय स्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Eknath Shinde Shiv Sena) अध्यक्ष होऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांच्या तोंडी परीक्षेचा संपूर्ण भाग आज रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता. 

तोंडी परीक्षा कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचं दिसतंय असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष भविष्यात उभा राहू शकतो. त्यावेळी ती सर्वायव्हलची अर्थात अस्तित्त्वाची लढाई असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं. 

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

मला कुठेतरी जाणवायला लागलं आहे,की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतात का? जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात. आफ्टर लोकसभा आणि बिफोर विधानसभा म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे मनसे (Raj Thackeray MNS) विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा  शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का हे मला जाणवायला लागलं आहे.   

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भाषण करुन आपण शिवसेनेचे अध्यक्ष होणार नाही हे जरी सांगितलं असलं तरी त्याचा अर्थ होय असा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

भाजपचा जो गेमप्लॅन आहे  तो समजला पाहिजे. मोदी  म्हणाले उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु असं म्हणत त्यांनी गाजर दाखवलं आहे. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेऊन, हळूवारपणे मेन रजिस्टर्ड अर्थात नोंदणीकृत शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ती शिवसेना देण्याचा घाट तरी घातला नाही ना असा प्रश्न आहे. यावर सर्व्हायवल कोणाचं राहणार,जसं इंडिकेट सिंडिकेट काँग्रेस झाली होती त्यावेळी इंदिरा गांधींची काँग्रेस वाचली. अशा परिस्थितीत उद्या राज ठाकरे अध्यक्ष झाले तर ते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी सर्वायवलची चुरस लागेल. त्या चुरशीत कोण तग धरेल, हे बघावं लागेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

मनोज जरांगे यांच्यासोबत विधानसभेला युती शक्य

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबतच्या युतीवरही भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत आम्ही मनोज जरांगे यांना युतीचा प्रस्ताव दिला होता, पण सध्या ती युती होऊ शकली नाही. पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकते, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

Prakash Ambedkar on Raj Thackeray VIDEO : प्रकाश आंबेडकर राज ठाकरे यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

राज ठाकरेंसोबत युती करताना नातं आडवं येतं का? मनसे सोबतच्या युतीवर आदित्य ठाकरे स्पष्ट म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Embed widget