मोठी बातमी : राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती - आघाडी नाही!
Raj Thackeray : एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी घोषणा केली आहे. विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती - आघाडी नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, आगामी निवडुकीसाठी ना यु्त्या , ना आघाड्या... आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल. ज्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या लोकांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू... जगाला हेवा वाटवा असा महाराष्ट्र घडावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने आमच्या हातात द्यावी .
आम्हाला सत्ता दिली तर महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही : राज ठाकरे
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. सत्तेतील आणि विरोधातील लोक निवडणुकीसाठी काहीही करतील. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या कारण तुमचे पैसे आहेत आणि मतदान मनसेच्या उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला : राज ठाकरे
रतन टाटासारखा सरळ सभ्य माणूस सर्वांना आवडतो तर राजकारणी सरळ सभ्य का नाही आवडत? खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, विचार सोडून सत्तेत बसायचे हेच गेली पाच वर्षे सुरू आहे. हे फोडा फोडी असेल धंदे करणारे राजकारणी हवेत? आज महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा.... अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार, ही अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
महाराष्ट्रात कुणाला काहीच फुकट नकोय, फुकटचे पैसे नकोत, हाताला काम द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका केली आहे. माझी भूमिका आधीच सांगितली होती, धमक पण आहे, मी शब्द देऊ शकतो. महाराष्ट्रात माझ्या हाताला सत्ता, द्या, प्रत्येकाला काम असेल,पण ते जातीप्रमाणे देणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Mumbai Speech : जे पैसे वाटतील ते नक्की घ्या: राज ठाकरे
हे ही वाचा :