एक्स्प्लोर

Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांवर दुहेरी संकट, आता ओव्हरटाईमशिवाय पर्याय नाही, आमदार अपात्रता प्रकरणात काय होणार?

MLA Disqualification Case : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना या प्रकरणात सुनावणी आटोपताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना आमदार अपात्रताप्रकरणी  (Shiv Sena MLA Disqualification case) ओव्हरटाईम करावा लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात (Maharashtra winter session) अध्यक्षांसमोर सुनावणी घेण्याचे आव्हान आहे. दिवसभर अधिवेशनाचं कामकाज असल्यामुळे त्यांना संध्याकाळी सुनावणी घ्यावी लागणार आहे.  नागपूर (Nagpur) येथे हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सकाळच्या सत्रात  हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार असल्यामुळे, आमदार अपात्रता प्रकरणात सायंकाळी 4 ते 7 यादरम्यान सुनावणी होऊ शकते. 

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात सुनावणी आटोपताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सगळी साक्ष संपल्यावर निकाल देण्यास 20-25 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची विनंती केली जाऊ शकते.  तूर्तास उद्यापर्यंत शिंदे गटाच्या वकिलांना उलट साक्ष घेण्यास मुदत आहे. 1 ते 11 डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे वकील उलट साक्ष घेणार आहेत. 

शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी (cross examination of Eknath Shinde Shiv Sena)

 आमदार सुनील प्रभू आणि कार्यालय सचिव विजय जोशी यांची उद्या उलट साक्ष घेतली जाणार आहे. तर 1 डिसेंबरपासून शिंदे गटाच्या नेत्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. शिंदे गटातील पाच आमदार आणि एक खासदारांची उलट साक्ष होणार आहे.  आमदार भरतशेठ गोगावले, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, दिलीप लांडे आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे.  

सुनील प्रभूंची उलट तपासणी (Sunil Prabhu cross examination)

ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी सुरु आहे.  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani)  हे सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत तआहेत. 21 जून 2022 च्या ठरावावरून प्रभू यांना सवाल करण्यात आले. 21 जूनचा ठराव कधी तयारच केला नव्हता असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानींनी केला. हा दावा सुनील प्रभूंनी फेटाळला. 

सुप्रीम कोर्टाची डेडलाईन (Supreme Court on Maharashtra politics)

आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. याप्रकरणी 30 ऑक्टोबरला  सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी पार पडली. त्यावेळीही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वेळापत्रक फेटाळलं होतं.इतकंच नाही तर अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं   नाराजी व्यक्त केली. तसेच,  सर्वोच्च न्यायालयानं  31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देशविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. 

VIDEO : हिवाळी अधिवेशनातही आमदार अपात्रता सुनावणी 

संबंधित बातम्या  

आता भरत गोगावलेंसह 5 आमदार आणि एका खासदाराची उलट तपासणी, ठाकरे गटाच्या वकिलांचे टोकदार प्रश्न तयार  

Supreme Court Rahul Narwekar : सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली.., विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणतात, मी तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget