Rahul Gandhi: 'चौकशीवर चर्चा का झाली नाही?' पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील भाषणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi On PM Modi: पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी थेट आरोप करत म्हणाले की, पंतप्रधान त्यांना (Gautam Adani) वाचवत आहेत.
Rahul Gandhi Reaction On PM Modi: लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या वेळी विरोधी पक्षांनी गोंधळ घातला आणि अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी थेट आरोप करत म्हणाले आहेत की, पंतप्रधान त्यांना (Gautam Adani) वाचवत आहेत.
Rahul Gandhi Reaction On PM Modi: मोदी सरकारमध्ये अदानींचा व्यवसाय प्रचंड वाढला : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले आहेत की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकशी बाबत का बोलले नाहीत? बेनामी संपत्तीवर चर्चा का झाली नाही?” राहुल गांधी यांनी, मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. अदानी पंतप्रधान मोदींचे मित्र नसते तर चौकशी झाली असती, असं ते म्हणाले आहेत. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी मंगळवारी (7 फेब्रुवारी) मोदी सरकारमध्ये अदानींचा व्यवसाय प्रचंड वाढला आणि भाजपला त्याचा वैयक्तिक फायदा झाला, असा दावा केला होता. दोघांच्या जवळीकतेमुळेच हे घडल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.
#WATCH | I'm not satisfied with (PM's speech). No talk about inquiry happened. If he (Gautam Adani) is not a friend then he (PM) should have said that inquiry should be conducted. It's clear that the PM is protecting him (Gautam Adani): Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/uJ8Icuqqr3
— ANI (@ANI) February 8, 2023
PM Modi: पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेतील राहुल गांधींच्या भाषणाकडे लक्ष वेधले आणि ते म्हणाले की, काही लोकांच्या भाषणानंतर समर्थक उड्या मारत होते. ते आनंदाने म्हणू लागले की, बरोबर बोललात! कदाचित त्यांना आज चांगली झोप लागली असेल, कदाचित आज त्यांना जागही आली नसेल. ते पुढे शायरीत म्हणाले की, ये कह-कह कर हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं.
राहुल गांधी यांनी संसदेत दावा केला होता की, अदानींसाठी विमानतळ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर कोणी विमानतळ व्यवसायात नसेल तर ते विमानतळ कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत नाहीत, हा नियम भाजपच्या केंद्र सरकारने अदानींसाठी बदलला. तसेच 2014 नंतर अदानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.