शिवतीर्थावर पोहोचताच राहुल गांधींकडून छत्रपती शिवराय, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावरिल सभेपूर्वी अभिवादन केले आहे.
Rahul Gandhi in Mumbai : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावरिल सभेपूर्वी अभिवादन केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडत आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. राहुल गांधी शिवाजी पार्कवरिल या सभेतून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. या सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती आदी नेते उपस्थित आहेत.
बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन
काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा सुरुवातीपासून वेगळी होती. दरम्यान, 2019 मध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सामील झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावर येत अभिवादन केले आहे.
लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राहुल गांधींनी लोकसभेच्या निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. आज सकाळी राहुल गांधी यांची मुंबईत 'न्याय संकल्प' पदयात्रा पार पडली. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही 'न्याय संकल्प' पदयात्रा स्वरुप होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत इंडिया आघाडीचे एकजूट पाहायला मिळणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा
भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा आज मुंबईत पार पडत आहे. राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत मणिपूर पासून अनेक राज्यात भारत जोडा न्याय यात्रा नेली. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. या यात्रेतून राहुल गांधींनी पीएम मोदींवर चौफेर टीका देखील केली होती. शिवाय, द्वेषाच्या राजकारणाला मी प्रेमाने उत्तर देत असल्याचेही ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या