Rahul Gandhi Live Updates : ईव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत; राहुल गांधींचा घणाघात
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पोहोचले आहेत. या सभेसाठी उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे दिग्गज नेते शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत.
LIVE
Background
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) आज शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. राहुल गांधी सभेसाठी शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे दिग्गज नेत्यांनी सभास्थळी हजेरी लावली आहे. निवडणुकीपूर्वी इंडियाचं हे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे.
Rahul Gandhi Live Updates : देशातील 90 अधिकारी देश चालवतात, राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi Live Updates : राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की, 'देशातील 90 अधिकारी देश चालवत आहे, मी या सिस्टमला समजू शकतो, मी ते आतमधून पाहिले असून, त्यामुळे मोदी मला घाबरतात. सर्व काही मी पाहिले असून, मला त्यातील सर्व काही समजते. अनेक वर्ष ही सिस्टीम मी जवळून पहिली आहे. मोदी मला दाबू शकत नाही. या 90 अधिकाऱ्यांमध्ये तीन दलित समाजाचे आणि एक आदिवासी समाजाचे आहेत. यामध्ये ओपनमधील एकही अधिकारी मला दाखवून द्यावा. देशाची पॉलिसी हे 90 लोकं बनवतात. त्यात आणखी 200 ते 300 आणखी लोकं जोडून घ्या, तसेच 50 ते 60 अरबपती जोडून घ्या, ही खरी शक्ती आहे जे देश चालवत आहे. यातून तुम्ही कोणीही वाचणार नाही.'
Rahul Gandhi Live : 22 लोकांकडे देशाची संपत्ती, राहुल गांधींचा उद्योगपतींवर घणाघात
Rahul Gandhi Live : राहुल गांधींचा उद्योगपतींवर घणाघात करत म्हटलं की, 'देशात 22 अशी लोक आहेत, ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे जेवढी देशातील 170 कोटी लोकांकडे आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र,10 दिवसांत एका लग्नासाठी विमानतळ सुरू होतो. लग्नासाठी विमानतळ सुरू करताय करा, पण देशातील इतर भागात देखील विमानतळ सुरू करा. या लोकांनी काय चुकी केली आहे.'
Rahul Gandhi Live Updates : 56 इंचाची छाती नाही, पोकळ - राहुल गांधी
Rahul Gandhi Live Speech : राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की, 'नरेंद्र मोदी, भाई और बहनों हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचाची छाती नसून पोकळ आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. मी विचार केला, मात्र एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करण्याचा ठरवलं. तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झालं पाहिजे. धारावीत टॉयलेट आहे, आज या धारावीमधील लोकांना ती शक्ती त्यांच्या घरातून बाहेर काढून फेकत आहे.'
Rahul Gandhi Live at Shivaji Park : विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही - राहुल गांधी
Rahul Gandhi Live : ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत. विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला सरकार तयार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Rahul Gandhi at Shivaji Park : 22 लोकांकडे देशाची सर्व संपत्ती, राहुल गांधींचा घणाघात
Rahul Gandhi Live Updates : 22 लोकांकडे देशाची सर्व संपत्ती एकवटली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.