एक्स्प्लोर

Pune Shanivar Wada: शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल

Pune Shanivar Wada: एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुण्यातील शनिवार वाडा नमाज प्रकरणावरुन भाजपला लक्ष्य केले. मुरलीधर मोहोळांचा जमीन घोटाळा झाकण्यासाठी प्रकरण तापवले

Pune Shanivar Wada: पुण्यातील शनिवारवाड्यात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्यावरुन सध्या राजकारण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी यावरुन वातावरण तापवणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा जमीन घोटाळा समोर आल्याने लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाडा प्रकरण समोर आले. महिलेने नमाज वेळ झाल्याने त्यांनी नमाज पडली त्याने काय झाले? त्यांनी दगडाला कलर मारून शनिवार वाडा (Shanivar wada) आमचा असल्याचे म्हटले होते का? शिवाजी महाराजांनी मुस्लीम समाजाला विरोध केला नाही, मग हे कोण चिंधीचोर आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसी आहे की, मुद्दा दुसऱ्याकडे वळवणे. भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिंकू पिंकू आले असून हिंदुत्ववादाची धुरा आमच्या खांद्यावर असल्याचे भासवत आहेत. नमाज पडली म्हणजे वाडा ताब्यात घेतला आहे, असे होत नाही. मस्तानीने किती वेळा त्यावेळी तिथे नमाज पडली असेल कुणाला माहीत आहे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोलत होते.

शनिवारवाड्यात आमची बहीण नमाज पडली तर त्याचा एवढा मोठा मुद्दा करण्यात आला. आम्ही कडक शब्दात निंदा करतो की, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लिम समाजाने शिकले पाहिजे फिरण्यासाठी आलेल्या बहिणी अजान होताच नमाज पडतात. आम्ही ऐकण्यासाठी जन्माला आलो आहेत का? तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार. तुमची सभा होऊ द्या ,शिव्या देऊ द्या, मग आमची सभा लावू आणि आमचीदेखील जीभ चालेल, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले.

Bihar Election 2025: बिहारच्या निवडणुकीत एमआयएम सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल: इम्तियाज जलील

बिहार निवडणुकीत आम्ही सहा जागा मागितल्या होत्या.  भाजपला हरवायचे असेल तर सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. पण निवडणूक लढवू नका, असे तेजस्वी यादव म्हणाले. आता आम्ही बिहारला येत आहोत आणि एमआयएमची ताकद दाखवू. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. आमच्यासाठी भाजप आहे तेच काँग्रेस आणि आरजीडी आहे. तेजस्वी यादव म्हणतात भाजपचा पराभव करायचे असेल तर एमआयएमने निवडणूक लढवू नयेत. आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आहोत का?, असेही जलील यांनी म्हटले.

Mumbai news: एमआयएम पक्षाची महत्त्वाची बैठक

इम्तियाज जलील यांनी मंगळवारी एमआयएम पक्षाच्या मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्याचे सांगितले.आम्ही आगामी सर्व निवडणूक लढवणार आहोत, त्यानुसार सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. आमच्या महाराष्ट्र टीमने आज आढावा घेतला आहे. त्यानुसार कुठे किती जागा लढवली जाईल, याचा आम्ही निर्णय घेणार आहे. कुणासोबत युती करावी याबाबत स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. आम्ही ज्यांना उमेदवारी देणार अहोत त्यांना महत्वाचे नियम असणार आहेत. जर दारुण पराभव झाला तर तेथील जबाबदार व्यक्तीला घरचा रस्ता दाखवला जाणार आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

 माझा मुलगा नगरसेवक, आमदारसाठी,खासदारकीच्या निवडणुकीसाठी कधी उभा राहणार नाही. एका पिता म्हणून माझे मत आहे की, या घाणेरड्या राजकारणामध्ये माझा मुलगा उतरणार नाही. माझे वैयक्तिक मत आहे, काही पित्यांना वाटत असेल की, राजकारण घाणेरडं असूनही माझा मुलगा जावा तर तो त्यांचा निर्णय आहे, अशी टिप्पणी इम्तियाज जलील यांनी केली.

आणखी वाचा

हिंदू-मुस्लिम भाई भाई, सर्वांचं रक्त लाल; शनिवार वाडा प्रकरणानंतर दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai Mahapalika Election : खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे? प्रशासकीय राजवटीला नागरिक वैतागले
Mahapalikecha Mahasangram Thane : ठाण्यातील व्यापारी त्रस्त, आश्वासनं कधी पूर्ण होणार?
PCMC Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र? भाजपला शह देणार
Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: पुत्र पार्थ पवारांवरील आरोपांमुळे अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे परत जाण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
Embed widget