विधानसभेसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार, पुण्यात महासंमेलनात ठरवण्यात येणार निवडणुकीचा रोडमॅप
पुण्यात आज भाजपचं महासंमेलन असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी विधानसभेसाठी निवडणुकीचा रोड मॅप ठरवला जाणार आहे.
Pune news: लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) अवघा एक महिना लोटून गेल्यानंतर विधानसभेसाठी आज भाजप रणशिंग फुंकणार आहे. पुण्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे महासंमेलन (General Assembly BJP) आयोजित करण्यात आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महासंमेलन अतिशय महत्त्वाचं समजलं जात आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेळावे, बैठका, सभा यासह घडामोडींना वेग आला आहे. अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) आलेली निराशा पुन्हा येऊ नये यासाठी भाजपसह (BJP) मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकांयला सुरूवात केली आहे.
राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास 5000 कार्यकर्ते व पदाधिकारी या महासंमेलनाला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभेत ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने खूप आधीपासून तयारीला सुरुवात केली आहे.
विधानसभेचा रोड मॅप ठरणार!
लोकसभा निवडणुकीला आता महिना लोटून गेल्यानंतर विधानसभेसाठी भाजपने आज पुण्यात महासंमेलन आयोजित केलंय. या महासंमेलनात विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरणार असून महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणूक प्रचार आणि तयारीसाठी रोड मॅप ठरवला जाणार आहे.
विधानसभेच्या तयारीसाठी भाजप मैदानात
मंथन बैठका, चर्चा झाल्या असून प्रभारी बैठक आहे आता झाल्या आहेत. या महासंमेलनाला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहिले असून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका प्रतिनिधी यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांचीही या संमेलनास उपस्थिती आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात बैठक घेणार आहेत. दरम्यान या बैठकीआधी काल(शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अमित शाहांसोबत (Amit Shah) बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीला राज्यासह देशात मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. आज पुण्यात (Pune) भाजपचे चिंतन शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशनही आज पुण्यात पार पडणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे जवळपास 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा: