Tata Airbus Project : प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत : जयंत पाटील
Tata Airbus Project : प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
Tata Airbus Project : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus) देखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे. प्रकल्प गुजरातला जात आहेत मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील काय म्हणाले?
याबाबत ट्वीटच्या माध्यमातून भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, "वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते."
"महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?" असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 28, 2022
कसा आहे टाटा-एअरबस प्रकल्प?
टाटा-एअरबस प्रकल्पात मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार असून एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. सी-295 एमडब्ल्यू विमानं एअरफोर्समध्ये असलेल्या एव्हीआरओ- 748 विमानांना रिप्लेस करणार आहेत. एकूण 22 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. यातील 40 विमानं भारतात तयारी केली जातील. टाटा-एअरबस हा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील विमान निर्मिती प्रकल्प असणार आहे. ज्यामुळे सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सची मोनोपॉली संपुष्टात येणार आहे.
गुजरातच्या बडोद्यात प्रकल्प होणार, पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार
हा प्रकल्प महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात होईल अशी शक्यता होती. परंतु प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
संबंधित बातमी