पाच दिवस ईडी कार्यालयात बसून पंतप्रधान मोदी माझी वर्तन बदलू शकत नाही: राहुल गांधी
Rahul Gandhi On Pm Narendra Modi: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, मला पाच दिवस अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बसवून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी वागणूक बदलू शकत नाहीत.
Rahul Gandhi On Pm Narendra Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, मला पाच दिवस अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बसवून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी वर्तन बदलू शकत नाहीत. तत्पूर्वी नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची ईडीने गेल्या महिन्यात पाच दिवस चौकशी केली होती. नरेंद्र मोदींनी संभ्रमावस्थेतून असे पाऊल उचलले, पण माझ्या वागण्यात कोणताही बदल होणार नाही. हे त्यांना माहीत नव्हते, असे राहुल गांधी म्हणाले.
शुक्रवारी वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी गेले होते. यावेळी एका आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, "भारत सरकार... पंतप्रधानांना असे वाटते की मला पाच दिवस ईडी (कार्यालय) मध्ये बसवून माझे वर्तन बदलेल. हा पंतप्रधानांच्या मनातील भ्रम आहे. दोघांनाही वाटतं, ते हिंसक वर्तन करून लोकांना धमकावू शकतात. हा त्यांच्या मनात मोठा भ्रम आहे. कारण त्यांच्यात हिंमत नाही. त्यांना वाटते की हिंसा इतर लोकांच्या वर्तनात बदल घडवू शकते. मात्र असं होत नाही. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांचे वर्तन हिंसाचार आणि धमक्यांनी बदलत नाही.''
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी वायनाड येथील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. बफर झोनच्या मुद्द्यावरून सीपीआय(एम) च्या विद्यार्थी संघटना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच कार्यालयाची तोडफोड केली होती. राहुल यांनी त्यांचे (एसएफआय कार्यकर्त्यांचे) कृत्य बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ''हिंसाचारानेच समस्या सुटतील, असा विचार देशात सर्वत्र दिसत आहे. पण हिंसेने कधीच प्रश्न सुटत नाही. असं करणं योग्य नाही. ते बेजबाबदारपणे वागले.''
इतर महत्वाच्या बातम्या:
DRDO : भारताच्या 'घातक' ड्रोनचे पहिले यशस्वी उड्डाण, चीन-पाकिस्तानचा उडवणार थरकाप
Presidential Election 2022 : ...तर आम्हीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असता', ममता बॅनर्जींचे मोठे वक्तव्य
Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडात मोठा खुलासा! आरोपी गौस मोहम्मद 30 लोकांना घेऊन गेला होता पाकिस्तानात, धक्कादायक पुरावे समोर