एक्स्प्लोर

Video: लेकीसाठी आई धावली , प्रतिभा पवार व्यासपीठावर येताच...; सुप्रिया सुळेंनी सांगितलं राज'कारण'

विशेष म्हणजे लेकीसाठी प्रचाराला आलेल्या प्रतिभा पवार व्यासपीठावर मागच्या रांगेत बसल्याचंही दिसून आलं.

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच राजकीय सामना रंगल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्कंठा लागून राहिली आहे. येथील मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्यात थेट लढत होत असल्याने पवार कुटुंबातील इतर सदस्यांनीही थेट प्रचाराच्या मैदानात एंट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे आईसाठी प्रचार करताना दिसून आल्या. आता, सुप्रिया सुळेंसाठी त्यांच्या आई म्हणजेच प्रतिभा पवार (Pratibha pawar) ह्याही आपल्या लेकीसाठी राजकीय मैदानात उतरल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे 1991 पासून प्रतिभा पवार कधीच राजकारणात, किंवा प्रचारासाठी दिसल्या नाहीत. मात्र, यंदा लेकीसाठी आई प्रचारात आल्याचे दिसले. त्यामुळे, प्रतिभा पवार पहिल्यांदाच निवडणूक काळात राजकीय व्यासपीठावर दिसल्या आहेत.

बारामतीमधील महिला मेळाव्यासाठी प्रतिभा पवार व्यासपीठावर आल्यानंतर सर्वच महिलांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे लेकीसाठी प्रचाराला आलेल्या प्रतिभा पवार व्यासपीठावर मागच्या रांगेत बसल्याचंही दिसून आलं. आईने बारामतीमधील महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला यावं, असा सुनंदा वहिनींचा आग्रह होता. म्हणून आई महिला मेळाव्याच्या व्यासपीठावर आली होती. तसेच, माझी मुलगी नेहमीच प्रचारात सहभागी होते, तीदेखील पॅम्प्लेट वाटतं होती, असेही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. तर, आपल्या भाषणात आईची आठवण सांगताना महागाईवरुन सरकारला लक्ष्यही केलं. 

2014 मध्ये आम्ही घरी गेल्यानंतर आई म्हणायची, यावेळी 2014 मध्ये तुमचं सरकार येत नाही. त्यावेळी, का आमचं सरकार येत नाही, असे मी आईला विचारत असे. त्यावर, एवढी महागाई झालीय, मग तुमचं सरकार येत नाही. माझ्या आईचं म्हणणं खरं ठरलं, आमचं सरकार आलंच नाही. आता, आई पुन्हा घरात पाऊल ठेवलं की कटकट सुरू करते, भाज्या महागल्या, डाळी महागल्या, दुधाचे भाव.. असे म्हणत आई महागाईवर भाष्य करते. तर, यावेळीही महागाईने लोकं त्रस्त झाले असून आताही हे सरकार येत नाही, अशी आठवण सुप्रिया सुळेंनी आईसमोरच सांगितली.

धमक्यांची चर्चा वारंवार होतेय

जयंत पाटील चॉपरने सांगलीवरून प्रचाराला आले, तेच चॉपर सुषमा अंधारे ह्यांना घेण्यासाठी अलिबागला जात असताना क्रॅश झाले. सुदैवाने कुणालाही काही झालेलं नाही, हे त्यांचं भाग्य असल्याचं सुळे यांनी म्हटलं. तसेच, भरत गोगावलेंनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या आरोपावरही सुप्रिया सुळेंनी पलटवार केला.  धमक्यांची चर्चा वारंवार निवडणुकीत होत आहे, असे हल्ले होत असतील तर अतिशय चिंताजनक बाब आहे, प्रचंड घातक आहे. त्यामुळे, आपण दडपशाहीच्या दिशेने चाललेलो असे पुन्हा वाटते 

बँकेतील 500 च्या नोटा गायब

बारामती सहकारी बँकेतल्या पाचशेच्या नोटा गायब झालेले आहेत, असं कळतंय ह्या सगळ्याची माहिती आम्ही घेत आहोत. सुनंदा वहिनी प्रचारामध्ये जे बोलल्या ते खरं होताना दिसत आहे. धनशक्तीच्या वापरावरुन पुरावा मिळाला तर आम्ही तक्रार नक्की करणारं, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

मी एवढी मोठी नाही

दरम्यान, मोदी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, पंतप्रधानांवर बोलाव इतकी मी मोठी नाही. शरद पवार आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं कुठलही नातं नव्हतं. पण, त्यांचा मानसपुत्र म्हणून आजही पवार साहेबांचे नाव घेतलं जातं, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget