एक्स्प्लोर

सोलापूरला मिळाली पहिली महिला खासदार, प्रणिती शिंदेंनी काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा

Solapur First Female MP : सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75 हजार मतांनी विजय मिळवलाय.

Solapur, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75 हजार मतांनी विजय मिळवलाय. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय. 1951 पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या. हा इतिहास आज मोडलाय. 

प्रणिती शिंदेंनी काढला वडिलांच्या वचपा - 

सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशिलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.  तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पऱाभवाचा वाचपा काढला आहे. 

1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचलाय. 

प्रणिती शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

 हा सोलापूरकरांचा विजय आहे. जनतेने विश्वास ठेवून मोठी संधी दिली आहे. मी लोकसभेत जाऊन सोलापूरांचे प्रश्न मांडण्यासाठी आतुर आहे . सोलापूरच्या जनतेने भाजपला धडा शिकवला, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास?

आमदार प्रणिती शिंदेनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला. 2014, 2019 च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही. त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणला. सलग तीन वेळा आमदार राहिल्याने सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेची चांगली पकड आहे. तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलेच बळ देखील दिले आहे.  

सोलापूर मतदार संघाचा इतिहास काय ? Solapur Lok Sabha constituency History 

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाची ओळख होती. 1952 साली सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. सुरुवातीचे पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी. एन. राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 1957 साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले.

मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षांनी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदार संघात गाजवलं. 1962 साली मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडादी, 1967, 1971, 1977 सुरजरत्न दमाणी, 1980, 1984 गंगाधर कुचन, 1989, 1991 धर्मन्ना सादुल या काँग्रेस नेत्यांनी सोलापुरात खासदारकीच्या माध्यमातून देशाच्या संसदेत नेतृत्व केलं.

भाजपला मिळाला पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार - Paschim Maharashtra BJP 1st MP 

1996 मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्याळ यांनी पहिल्यांदा रोखला. लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरचाच नाही तरं पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भारतीय जनता पार्टीला मिळाला. मात्र केंद्रात इंदर कुमार गुजराल यांची सत्ता कोसळली त्यामुळे 1998 साली पुन्हा एकदा देशात निवडणुका लागल्या. याचं निवडणुकामध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली. 1998 आणि 1999 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला. 2003 साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजच्याच सुभाष देशमुखानी विजयश्री प्राप्त केला.

2014 मध्ये काँग्रेसचा गड भाजपने जिंकला, सुशीलकुमार शिंदेंचा पराभव - sushil kumar shinde 2014 election result -

भाजपच्या विजयाचा गाडा 2009 साली सुशीलकुमार शिंदेनी पुन्हा एकदा रोखला. भाजपचे नवखे असलेले उमेदवार शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एन्ट्री केली. याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते सारखे मोठी पदे भोगता आली. मात्र असं असताना देखील 2014 च्या मोदी लाटेत त्यांचा निभाव लागला नाही. नवख्या शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेना परभावाचा स्वीकारवा लागला. सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो.मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला. नवखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला. त्यानंतर 2019 साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेना परभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामिनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली.

2019 मध्ये त्रिशंकू लढत - sushil kumar shinde 2019 election result - 

2019 ची निवडणूक ही अनेक अर्थानी महत्वपूर्ण होती. सुशीलकुमार शिंदे सारख्या दिग्गज नेत्यासमोर भाजपने विद्यमान खासदारचा पत्ता कट करून अध्यात्मिक गुरु असलेल्या आणि ज्यांचा राजकारनाशी कसलाच संबंध नाही अशा डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलेलं होतं. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारानी राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली. सुशीलकुमार शिंदेचा सुमारे दीड लाख मतांनी डॉ. जयसिद्धेश्वर यांनी पराभव केला. तर प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget