एक्स्प्लोर

Praniti Shinde : भाजपने देशाला जाती-धर्माची कीड लावली, काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंचा घणाघात

Solapur Lok Sabha Election 2024 : भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे, असं म्हणत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदा टीका केली आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) दृष्टीने सोलापूर (Solapur) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. "मी लेक सोलापूरची" या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहेत. यावेळी भाजपवर प्रणिती शिंदे मोदी सरकारवर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत. भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमधील सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

प्रणिती शिंदेंना सरकारवर जोरदार घणघात

भाजपने देशाला धर्माची आणि जातीची किड लावल्याची टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे. मी राजकारणात टक्केवारी किंवा सत्तेसाठी आलेली नसून मला ईडीची भीतीही नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय. दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे. 

भाजपने धर्माची आणि जातीची कीड लावली 

'हाथी के दाात दिखाणे के एक और खाणे के एक' यांच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय, तर आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म - जातं करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत,आधी आपण असे नव्हतो.

10 वर्षात भाजपने काय काम केलं?

मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिलं. मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला, भाजपने तुम्हाला धोका दिला, तुमचा विश्वासघात केला. मागील 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं, हा एकच प्रश्न त्यांना विचारा, त्यांची बोलती बंद होईल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

400 सोडा, हे 100 पारही जाणार नाहीत

भाजपकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रातोरात अटक करतात. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे, तर एवढी भीती का आहे तुम्हाला? ही लोक 400 सोडा, मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे. समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर, त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं?

मी ईडीला घाबरत नाही

निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करताय. ज्या दिवशी असं व्हायला लागेल, त्या दिवशी लोकशाहीला धोका निर्माण व्हायला लागतो, म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवत आहेत. मी एकमेव आहे, जी विधानसभेत भाजप विरोधात बोलते. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या, मग बाकी ते टेन्शन माझं. मी ईडीबिडीला घाबरत नाही, मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget