Prakash Solanke on Pankaja Munde : मुंडेसाहेबांचे ऋण फेडायची वेळ आलीय, प्रकाश सोळंकेंची भावना, पंकजा मुंडेंना शब्द!
Prakash Solanke on Pankaja Munde : भाजपच्या बीड लोकसभेसाठीच्या (Beed Loksabha) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेतली.
Prakash Solanke on Pankaja Munde : भाजपच्या बीड लोकसभेसाठीच्या (Beed Loksabha) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेतली. प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांची भेट घेण्यासाठी पंकजा मुंडे त्यांच्या माजलगाव येथील निवासस्थानी पोहोचल्या होत्या. "बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलो असलो तरी आम्ही वैयक्तिक द्वेष ठेवला नाही", असं पंकजा मुंडे सोळंके यांची भेट घेतल्यानंतर म्हणाल्या.
मुंडे साहेबांचे ऋण फेडायची वेळ आली आहे - प्रकाश सोळंके
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भेट घेतल्यानंतर प्रकाश सोळंके म्हणाले, यापूर्वी माझ्या राजकीय कारकीर्दीमध्ये दोन वेळा आमदार मी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झालो पहिल्यांदा आमदार मला गोपीनाथ मुंडे यांनीच केलं होतं. गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नामुळेच मला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली होती मात्र त्यात माझा पराभव झाला. मात्र अनेक वर्षानंतर आता मुंडे साहेबांनी जे ऋण आमच्यावर केले ती फेड ण्याची वेळ आता पंकजा मुंडेंच्या माध्यमातून आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली.
प्रकाश सोळंके हे मित्र तर होतेच..
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, जेव्हा भाजपकडून प्रकाश सोळंके हे लोकसभेचे उमेदवार होते त्यावेळेस मी सतरा वर्षांचे होते. मी त्यांच्या प्रचारात करत होते आणि आता मात्र मी उमेदवार आहे आणि त्यांना भेटल्यानंतर आज आठवणी परत एकदा जाग्या झाल्या आहेत. प्रकाश सोळंके हे मित्र तर होते. मात्र आता ते मित्रपक्ष झाल्यामुळे आमची ताकद येथे वाढली आहे.
मुंडेंविरोधात ज्योती मेटे, बजरंग सोनवणे मैदानात उतरण्याची शक्यता
भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर ज्योती मेटे या मराठा समाजाच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बीड जिल्हा आक्रमक आहे. त्यात पंकजा मुंडे यांच्या विरोधात मराठा उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या