एक्स्प्लोर

Prajakt Tanpure BJP : अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेशाची तारीख फिक्स; भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार?

Prajakt Tanpure BJP : अहिल्यानगरची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडून तनपुरे यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच अहिल्यानगरची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडून तनपुरे  (Prajakt Tanpure) यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मात्र विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. 

2009 मध्ये पक्षाच्या सांगण्यावरून माझ्या वडिलांनी उमेदवार केली नाही, पुढे 2014, 2019, 2024 मध्येही पक्ष आदेश आम्ही पाळला. आता मात्र आमचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच संधी देईल अशी प्रतिक्रिया सत्यजित कदम यांनी दिली आहे. विधान परिषदेचे मतदान हे पसंतीक्रमानुसार असते, जर भाजपने प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली तर सत्यजित कदम हे उमेदवारी करणार का? स्थानिक भाजप कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत राहणार की, प्राजक्त तनपुरे यांना साथ देणार ? याची चर्चा आतापासूनच राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे. (Prajakt Tanpure)

 प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरुन उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. तनपुरे यांचा ३० मे रोजी भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरे यांनी माघार घेतली होती. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. (Prajakt Tanpure)

Prajakt Tanpure : जयंत पाटलांचा डीपीला लावला फोटो

प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची चर्चा होती. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का असेल अशी चर्चा आहे. 

Prajakt Tanpure : तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय: प्राजक्त तनपुरे

राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली होती. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले , तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली होती. 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा,  तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असे वाटले. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला  राहील त्याचे राजकारण संपत आहे. याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत प्राजक्त तनपुरे यांनी अलीकडेच बोलून दाखवली होती. त्यांच्या 'या' वक्तव्यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहेत अथवा त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget