एक्स्प्लोर

परभणीत अंदाज चुकला, ना पंजाबराव, ना महादेवराव; एक्झिट पोलमध्ये ठाकरेंच्या बंडुभाऊंनी खाल्ला भाव

एपीबी सीवोटर आणि विविध माध्यम संस्थांनी आज एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. त्यापैकी, सी वोटरनुसार महायुतीला 22 ते 26 आणि मविआला 23 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

परभणी : यंदाच्या लोकसभा निवडणुकांवेळी अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्या महादेव जानकर यांनी ऐनवेळी महायुतीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे, महादेव जानकर यांना महायुतीकडून एक जागा देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना दिली. त्यानुसार, परभणीत मतदारसंघातील रासपचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे, परभणीत शिवसेनेच्या ठाकरेंचे निष्ठावंत संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात थेट सामना रंगला. आता, लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची सांगता झाल्यानंतर आज एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. त्यानुसार, परभणी मतदारसंघात महादेव जानकर यांना धोक्याची घंटा असल्याचे दिसते. 

एपीबी सीवोटर आणि विविध माध्यम संस्थांनी आज एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. त्यापैकी, सी वोटरनुसार महायुतीला 22 ते 26 आणि मविआला 23 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाचा 45 जागांचं स्वप्न हे स्वप्नच राहिल्याचं या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. महायुतीतील भाजपा 17, शिंदे गट 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज या एक्झिट पोलनुसार आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 काँग्रेस 8, शरद पवार गट 6 आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या विविध पोलच्या अंदाजानुसार परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर पिछाडीवर असल्याचे दिसून येते. परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव यांच्यात थेट लढत झाली. तर, वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डख यांनीही निवडणूक लढवली. मात्र, एक्झिट पोलनुसार त्यांचा अंदाज चुकल्याचं दिसून येतंय.

TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार परभणीमध्ये ठाकरे गटाचे मविआचे उमेदवार संजय जाधव आघाडीवर. महायुतीचे रासपचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत. तर, परभणीजवळील बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचे एक्झिट पोलमधील आकडेवारीवरुन दिसून येते. 

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा 

2019 च्या परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे 42 हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते. बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली. राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती. यंदा राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्यासाठी प्रचार करत होते. मात्र, येथील मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष पाहायला मिळाला. स्वत: बंडू जाधव यांनीच याबाबत कबुली दिली. मनोज जरांगे यांचा फायदा मला व बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा बंडू जाधव यांना झाल्याचे बोलले जाते.  

शिवसेना फुटीनंतर पक्षनिष्ठ कायम

शिवसेना फुटीनंतर संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे, परभणीतून बंडू जाधव यांनात उमेदवारी देण्यात आली. अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे, त्याचा फायदा निश्चितचपणे त्यांना होऊ शकतो, असं येथील राजकीय तज्ज्ञ सांगतात.

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार 

परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे. या शिवाय जिंतूर, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे. या 6 मतदारसंघांपैकी जिंतूर व परतूर या 2 मतदारसंघात भाजपचे, गंगाखेड मतदारसंघात रासपचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. म्हणजेच, भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक-एक आमदार आहेत. तर महायुतीचे 4 आमदार असल्याचे दिसते.  

जानकर यांच्यासाठी मोदींची सभा

जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण असलेल्या परभणी जिल्ह्यातून आजही रोजगारासाठी हजारो तरुन स्थलांतर करत आहेत. त्यामुळे, उद्योगधंदे नसणे, बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे मतदारसंघात प्रभावीपणे आहेत. त्यातच, महादेव जानकर यांनी मी परभणीत उद्योगधंदे आणील व शेतकऱ्यांसाठी काम करेल असे आश्वासन दिले होते. यंदाही कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देण्याचं आश्वासन येथील जनतेला राजकीय नेत्यांनी दिलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महादेव जानकर यांचा माझा लहान भाऊ असा उल्लेख केल्याने जानकर यांचा विजयाचा आत्मविश्वास बळावल्याचं दिसून आलं. 

अहमदनगरमध्ये लंके आघाडीवर

TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत. डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. डॉ. सुजय विखे पाटील महायुतीकडून भाजपाचे उमेदवार आहेत.

बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर

बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंड उमेदवार आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्याबरोबर आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर असतील. बजंरग सोनावणे पिछाडीवर आहेत. सोनावणे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.

एबीपी सी वोटर एक्झिट पोल

महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 

महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1

एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12

(Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.)

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget