मोठी बातमी : पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी
Beed News : पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली.
बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची गाडी मराठा आंदोलकांनी (Maratha Andolak) रोखली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या गाडीच्या (Pankaja Munde Car) समोर येऊन काही मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) घोषणा देत होते. पोलिसांनी आंदोलकांना समजावल्यानंतर सुद्धा आंदोलन काही केल्या मागे हटायला तयार नव्हते. म्हणून अखेर पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करत आंदोलकांना बाजूला करावे लागले. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली
पंकजा मुंडे या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली असून मतदारसंघातील भेटीगाठी वाढवल्या आहेत. केज तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांनी अडवलं.केज तालुक्यातील औरंगपूर येथे पंकजा मुंडे या पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना त्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं. तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
पंकजा मुंडे या बुधवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होत्या, यावेळी केज तालुक्यात एका सप्ताहाच्या कार्यक्रमाला जात असताना मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवली आणि त्यांने पुढे जाण्यापासून रोखलं. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा रस्ता अडवत घोषणाबाजी केली.
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया?
पंकजा मुंडे यांनी याघटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, मी तुकाराम बीजच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमाला दरवर्षी मी आणि प्रीतमताई भेट देत असतो. मी दर्शनाला गेले होते. मी तिथे जाताना काही मराठा आंदोलकांनी रुमाल दाखवले. त्यानंतर माझी गाडी अडवली ते आंदोलक कोण होते, याबाबत मला पोलिसांनी माहिती घेईन.
मराठा आंदोलक की राजकीय खेळी?
मी आज तुकाराम बीज कार्यक्रमाला गेले होते. दर्शन घेतले पण पुढे जाता आले नाही. माझी कायम भूमिका असते की माझा कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. हातात काळा रुमाल घेवून काही मुलं थांबले होते. हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील लोक होते, असं मला अजिबात वाटतं नाही, हे राजकीय लोक होते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की मराठा आंदोलक शांततेने आंदोलन करतात त्यामुळे माझी गाडी अडवणारे नेमकं कोण होते, याचा अभ्यास करावा लागेल. हे आंदोलक मनोज जरांगे पाटालांचे समर्थक नसून इतर राजकीय पक्षांचे लोक असण्याची शक्यता असल्याचं गंभीर आरोप यावेळी पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर आरोप केला आहे.
पाहा व्हिडीओ : पंकजा मुडेंची गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीमार, पोलिसांकडून सौम्य लाठीमार
महत्त्वाच्या इतर बातम्या :