Pankaja Munde and Dhananjay Munde : मुंडे बहिण-भावाची ताकद दिसणार, पंकजांच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे हजर राहणार, 12 वर्षानंतर भगवानगडावर एकत्र
Pankaja Munde and Dhananjay Munde : भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यास एकत्रित दिसणार आहेत.
Pankaja Munde and Dhananjay Munde, बीड : मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थित हा दसरा मेळवा पार पडत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023 मध्ये महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्रित आलेले पाहायला मिळाले आहेत.
मुंडे घराण्यात पहिली ठिणगी कधी पडली?
धनंजय मुंडे यांना 2009 मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांची उमेदवारी गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केली आणि इथूनच धनंजय मुंडे यांच्यामध्ये नाराजीला सुरुवात झाली. त्यानंतर नाराज झालेल्या धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्याशी सल्लामसलत केली. 2012 मध्ये आधी वडील पंडितांना मुंडे आणि त्यानंतर 2013 मध्ये स्वतः धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची पहिल्यांदा विरोधात भूमिका
आधी विधानसभेतून झालेली नाराजी आणि त्यानंतर परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी वेगळा गट उभा करून गोपीनाथ मुंडे यांना आव्हान दिले. दसरा मेळावाला गोपीनाथ मुंडे हे भगवानगडावर दरवर्षी जायचे मात्र बंडखोरीनंतर धनंजय मुंडे एकदा भगवानगडावर पोहोचले. मात्र मुंडे समर्थकांनी त्यांना गडावरून हाकलून लावले. आता मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण भाऊ एकत्र आल्याने पहिल्यांदाच सावरगाव मधल्या भगवान भक्ती गडावर एकत्रित दसरा मेळाव्याला पाहायला मिळतील.
पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे भर सभेतून खंत व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत 6000 मतांनी आमची इज्जत गेली. ही खूप खोलवर झालेली जखम आहे. ही जखम अद्याप भरलेली नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवाबाबत भाष्य केलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी