Pankaj Bhoyar on Sharad Pawar : शरद पवार नैराश्येतून बोलताय, सत्तेत नसल्यानं ताशेरे ओढण्याशिवाय दुसरं काम नाही; पंकज भोयरांचा खोचक टोला
Pankaj Bhoyar on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा-ओबीसी वादावर भाष्य केले होते.

Pankaj Bhoyar on Sharad Pawar : मराठा समाजासाठी घेतलेल्या शासन निर्णयानंतर (Maratha Reservation GR) ओबीसी समाजात नाराजीचा सूर आहे. ओबीसी समाजाकडून या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत असून, आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी (OBC) समाज आमनेसामने आलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक तयार केला जातो आहे. दोन्ही समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. आता यावरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावलाय.
काय म्हणाले पंकज भोयर? (Pankaj Bhoyar on Sharad Pawar)
गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, शरद पवार साहेबांना सत्तेत राहण्याची आतापर्यंत सवय राहण्याची सवय होती. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय ते दुसरं कुठलंही काम करू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजाचा प्रश्न उत्कृष्टरित्या सोडविलेला आहे. विशेष करून ओबीसी समाजासाठी भव्य योजना ज्या इतिहासात कधी नोंद नाही अशा, योजना ओबीसींना दिल्या आहेत. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींसाठी वसतीगृहाची निर्मिती करण्यात आली. ओबीसी सोबतच मराठा बांधवांचा प्रश्न सुद्धा त्यांनी सोडविलेला आहे. त्यामुळे माननीय शरद पवार साहेब नैराशेत जाऊन असं वक्तव्य करीत असल्याचा त्यांनी शरद पवारांना लगावला.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार? (Sharad Pawar on Reservation)
शरद पवार म्हणाले की, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक तयार केला जातो आहे. राज्य सरकार काही हालचाल करायला लागले, असं हे दिसत आहे. दोन्ही समाजातील कटुता कमी करणे आणि सर्व घटक गावात एकत्र कसे राहतील यासाठी प्रयत्न करणं हे सरकारचे काम आहे. सरकारने ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र घेऊन बसले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे, दोन्ही समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्री जर अशी बैठक घेणार असतील, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे त्यांनी म्हटले होते.
पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत : पंकज भोयर (Pankaj Bhoyar on Maharashtra Rains)
दरम्यान, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर आणि सक्रिय असून त्या ठिकाणी व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना जी-जी मदत हवी असेल ती-ती राज्य सरकार पुरवित असल्याचे पंकज भोयर सांगितले आहे.
आणखी वाचा























