एक्स्प्लोर

नांदेड दक्षिणमध्ये आनंद बोंढारकर विजयी, काँग्रेसच्या मोहन हंबर्डेंना पराभवाचा धक्का

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Nanded South Assembly constituency) काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आनंद बोंढारकर यांनी विजय मिळवला आहे.

Nanded South Vidhansabha Election Result : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Nanded South Assembly constituency) काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आनंद बोंढारकर यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. नांदडे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhasabha Election) आचारसंहिता जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. दरम्यान,  नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापैकी आज आपण नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Nanded North Assembly constituency) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. सध्या या मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन हंबर्डे (Mohan Hambarde) हे आमदार आहेत. 

2019 च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी 3592 मतांच्या फरकाने अपक्ष दिलिप व्यंकटराव कंदकुर्ते यांचा पराभव करुन जागा जिंकली.नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा (एमपी) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59442 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, मागच्या काही दिवसापूर्वी खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. 

यावेळी नेमकं काय होणार? 

दरम्यान, यावेळी राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राष्टरवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. त्यामुळं मतांचं विभाजन झालं आहे. त्यामुळं निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघातून यावेळी इच्छुकांची संख्या जास्त आहे. काँग्रेसचे या मतदारसंघाव रवर्चस्व असतानाही विद्यमान आमादर मोहन हंबर्डे यांना उमेदवारी भेटते की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे. मागील काही दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यावेळी हंबर्डे यांनी देखील मुलाखत दिली होती. मात्र, आता काँग्रेसमधून ओकप्रकाश पोकर्णा हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं काँग्रेसमध्ये तिकीटासाठी चांगलीच रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपकडूल दिलीप कंदकुर्ते, शिवसेना शिंदे गटाकडून आनंद पाटील बोंडारकर हे इच्छुक आहेत.  

नांदेड दक्षिणमध्ये रोजगाराची मोठी समस्या

नांदेड दक्षिण मतदारसंघात रोजगाराची मोठी समस्या आहे. इथं उद्योग सुरु नाहीत, त्यामुळं नोकरीसाठी तरुणांना पुणे, हैदराबाद, मुंबई, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी जावं लागतं. त्यामुळं याठिकाणी एमआयडीसी व्हावी अशी मागणी होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget