एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

विक्रमादित्य ओमराजे... धाराशिवमधून सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी; 2 लाख 63 हजार मतांची आघाडी

शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. तर, महायुतीच्या उमेदवार बनून अर्चना पाटील मैदानात उतरल्या. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी येथील मतदारसंघात उत्साही मतदान झालं.

धाराशिव : उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची देखील पहिलीच निवडणूक (Election) असल्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar)  यांना विजय मिळणार की महायुतीच्या अर्चना पाटील खासदार बनणार हे काही तासांतच समजणार आहे. शिवाजी कांबळे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा धारशिवचे खासदार बनण्याचा सन्मान एकही उमेदवारास मिळाला नाही.  म्हणून, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून यंदा ओमराजे नवा विक्रम रचतात की, सासरे पद्मसिंह पाटील यांच्यानंतर अर्चना पाटील खासदार बनून दिल्लीला पोहोचतात हे लवकरच समजेल. मात्र, सुरुवातीच्या कलनुसार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांनी यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. येथील खासदारांचा फोनवरुन जनतेशी असलेला संपर्क चांगलाच चर्चेत ठरला. बसमध्ये जागा मिळवून देणं, जॅक देणं हे खासदाराचं काम आहे का, असा सवालही महायुतीच्या नेत्यांनी प्रचारात विचारला होता.  

लोकसभा मतदारसंघाचे पहिले कल हाती आले असून सकाळी 10 वाजेपर्यंतचे कल हाती आले होते. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली. तर, अर्चना पाटील पिछाडीवर आहेत. चौथ्या फेरीअखेर ओमराजे निंबाळकर यांनी 53,917 मतांची आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर, सरतेशेवटी ओमराजे निंबाळकर यांनी विजयाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.  ओमराजे निंबाळकर यांनी आत्तापर्यंतच्या धाराशिवमधील लोकसभा निवडणुकांचे सर्व रेकॉर्ड मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 63 हजार 967 मतांची विक्रमी लीड मिळाला आहे. ओमराजे यांना 6 लाख 6 हजार 183 मते तर अर्चना पाटील यांना 3 लाख 42 हजार 216 मते मिळाली आहेत.  आतापर्यंत 12 लाख 82 हजार 290 पैकी 10 लाख 48 हजार 187 मते मोजली असून अद्यापही 2 लाख 34 हजार मते मोजणे बाकी आहेत. या मतदारसंघात 2014 साली शिवसेना कडुन रवींद्र गायकवाड हे 2 लाख 34 हजार 325 मतांनी निवडून आले होते, त्यांनी डॉ पदमसिंह पाटील यांचा केला होतं पराभव केला होता. त्यामुळे, आता ओमराजे निंबाळकर विक्रमादित्य ठरले आहेत.  

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. तर, महायुतीच्या उमेदवार बनून अर्चना पाटील मैदानात उतरल्या. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी येथील मतदारसंघात उत्साही मतदान झालं. 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या धाराशिव लोकसभेसाठी 63.88 टक्के मतदान झाले. गत 2019 च्या तुलनेत ही टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं. वाढलेल्या टक्केवारीचा थेट फायदा ओमराजे यांनाच झाल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानेही लक्ष वेधले होते.  त्यामुळे, वंचितचे भाऊसाहेब आंधळकर ह्यांच्या मतांकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. 

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
1. ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओमराजे निंबाळकर 2.6 लाखांपेक्षा अधिक लीड
2. अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)  
3. भाऊसाहेब आंधळकर वंचित बहुजन आघाडी  

6 मतदारसंघात 5 ठिकाणी महायुती प्रबळ

धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी, तुळजापूर, कळंब, औसा, उमरगा आणि भूम-परांडा-वाशी या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या 6 पैकी 5 मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर, केवळ कळंब मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे, महायुती प्रबळ असून ओमराजे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्येक मतदारसंघातील थेट जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी बाजी मारली. 

मतदारसंघ

आमदार  

मतदान टक्केवारी

बार्शी राजेंद्र राऊत   65.28 टक्के
तुळजापूर राणा जगजितसिंह पाटील  65.40
भूम-परांडा-वाशी तानाजी सावंत  63.54
उमरगा ज्ञानराज चौघुले  60.29
औसा अभिमन्यू पवार  64.44
धाराशिव-कळंब कैलास पाटील  63.97

विरोधकांनी फोनवाला खासदार म्हणून हिनवलं

ओमराजे निंबाळकर यांची जमेची बाजू ठरली ती त्यांचा थेट जनसंपर्क. सर्वसामान्य लोकांशी फोनवरून संपर्क हाच ओमराजे यांचा USP ठरला. मात्र, विरोधकांनी  याच मुद्द्यावरून त्यांना ट्रोल केलं. जॅक आणि टॉमी देणं हे खासदाराचं काम आहे का, खासदाराने ठोस काय काम केलं? असा सवाल ओमराजेंच्या विरोधकांनी उपस्थित केला. तर, सामन्यातील सामान्य लोकांना विश्वास वाटतो की, ओमराजे आपलं हे साधारण कामसुद्धा करेल, हा विश्वासच मी कामावल्याचं ओमराजे यांनी निवडणुकीत सांगितलं. तर, तब्बल 60 हजारांपेक्षा जास्त मोबाईल नंबर आपल्याकडे सेव्ह असल्याचंही त्यांनी प्रचारात सांगितलं होतं.

सोयाबीन शेतकरी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न

ओमराजे निंबाळकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले होते. 11 हजार रुपयांवर गेलेला सोयाबीनचा भाव कोसळल्याने मोदी सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. तर, मराठा आरक्षणाचा मुद्दा मी लोकसभेत आग्रहाने मांडला. मराठा, लिंगायत, धनगर आरक्षणाचा मुद्दा आपण सातत्याने मांडल्याचे व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले होते. त्यामुळे, सोयाबीन शेतकरी व मराठा आरक्षण हा मुद्दा येथील निवडणुकीत महत्वाचा ठरला. महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथे सभा घेतली. त्यावेळी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात अधिक भाव दिल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने शेतकरी हित जपल्याचंही त्यांनी म्हटलं. तर, देवेंद्र फडणवीस आणि युती सरकारनेच मराठा समाजाला दोन वेळा आरक्षण दिल्याचा प्रतिवाद महायुतीच्या उमेदवारासाठी करण्यात आला.

2019 च्या निवडणुकीत 1.27 लाख मतांनी विजय

2004 साली कल्पना नरहिरे येथून धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेच्या खासदार बनल्या. तर, 2009 साली राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पद्मसिंह पाटील केवळ 6,787 मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या विजयाची परंपरा त्यांनी मोडित काढली. मात्र, पुन्हा 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत रविंद्र गायकवाड हे धनुष्यबाण चिन्हावर 2 लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन दिल्लीला पोहोचले. 2019 च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तिकीट देण्यात आले. ओमराजे यांनीही 2019 ची निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली अन् राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांना पराभूत करत ते 1 लाख 27 हजार मतांनी विजयी झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget