एक्स्प्लोर

'वन नेशन, वन इलेक्शन' घेतल्यास 5 हजार कोटींचा फायदा; केंद्रीय समितीची महाराष्ट्रातील राजकीय पक्षांशी चर्चा

गेल्या दोन दिवसांत राज्यातील विधान परिषद विरोधी पक्षनेते, सीएम, डीसीएम यांच्यासह अनेक नेत्यांसोबत समितीने चर्चा केली आहे.

मुंबई : वन नेशन वन इलेक्शन संदर्भात संसदेची समिती दोन दिवसांच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार पी.पी. चौधरी असून वन नेशन वन इलेक्शन (Election) संदर्भाने देशातील सर्वच राज्यांचा दौरा ही समिती करत आहे. या समितीच्या माध्यमातून प्रादेशिक राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी, प्रतिनिधींशी चर्चा केली जात आहे. त्याच अनुषंगाने या समितीने मुंबई दौऱ्यात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. विशेष म्हणजे शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा या समितीचा उल्लेख केला होता. आता, समितीचे प्रमुख पीपी चौधरी यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार पीपी चौधरी आणि समितीच्या इतर सदस्यांसमवेत 'संविधान (129वी सुधारणा) विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारणा) विधेयक 2024'वर बैठक घेण्यात आली होती. 

गेल्या दोन दिवसांत राज्यातील विधान परिषद विरोधी पक्षनेते, सीएम, डीसीएम यांच्यासह अनेक नेत्यांसोबत समितीने चर्चा केली आहे. देश हिताचा विचार करुन वन नेशन वन इलेक्शन कसे फायद्याचे राहील यासंदर्भात चर्चा झाली. एकाचवेळी निवडणुका झाल्या तर आर्थिक विकासात 5 हजार कोटींचा फायदा होईल. सध्या सरकार 15 हजार कोटी रुपये खर्च करत असून तो खर्च वाचल्यास त्यातून पायाभूत सुविधा निर्माण होतील, विकासाला गती मिळेल, असे चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

एकाचवेळी निवडणूका झाल्या तर पाच वर्ष निश्चित सरकार राहिल, त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनाही फायदा होईल. निवडणुका सातत्याने असल्याने शिक्षकांनाही ड्युट्या लागतात, त्याचा परिणाम शालेय शिक्षणावर होतो, अशी बाबही या समितीने निदर्शनास आणून दिली. लोकशाहीत एकाच वेळी निवडणूक घ्यावी यावर राजकीय मतमतांतरे असू शकतात, पण लोकशाहीत चांगल्या गोष्टी विचार करावा लागतो, असेही चौधरी यांनी म्हटले.  

30 राज्यात दौरा, पारदर्शक रिपोर्ट सादर करू

समितीसमोर वेगवेगळ्या सूचना येत आहेत, आम्ही त्या सूचना संसदेत मांडू, तिथे त्यावर चर्चा होईल.मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात असा पहिला विचार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विचार केला जाईल, अशी माहितीही चौधरी यांनी दिली. दरम्यान, देशातील 30 राज्यात आमची समिती जाईल, तिथल्या लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन पारदर्शक पद्धतीने रिपोर्ट सादर करू, असेही समितीचे अध्यक्ष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

हेही वाचा

सरन्यायाधीशांनी उल्लेख केलेलं कलम 142 नेमकं काय? जे ऐकताच अधिकारी पळतच आले

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Devendra Fadnavis: निंबाळकरांसोबत बसणं हा निर्लज्जपणा, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं
Satara Doctor Death: 'ही आत्महत्या नाही, हत्या आहे', Rahul Gandhi यांची गंभीर एक्स पोस्ट
Devendra Fadanvis Phaltan Speech :  निंबाळकरांवरील आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले,  FULL SPEECH
Pandharpur Vitthal Darshan : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल - रखुमाईचे 24 तास दर्शन सुरू
Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
Embed widget