एक्स्प्लोर

Video: अजित पवारांचे गुलाबी जॅकेट, पुतण्याच्या बदलत्या रंगावरुन काकांचा टोला, एकच हशा पिकला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष निर्माण झाले असून दोन्ही पक्ष सध्या विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी पेहराव बदलण्यापासून तयारी केल्याचं दिसून आलं.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे(SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) विधानसभेच्या तयारीला लागले असून रविवारी त्यांनी सोलापूर दौऱ्यात आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्याचं दिसून आलं. या दौऱ्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांना शरद पवारांना भूमिका स्पष्ट करण्याबाबत विचारणा केली. तर, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन, त्यांची भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर, शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच, यावेळी अजित पवारांच्या (Ajit pawar) गुलाबी जॅकेट आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा गुलाबी माहोल यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, शरद पवारांनी मिश्कीलपणे पवारस्टाईल उत्तर दिले.  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष निर्माण झाले असून दोन्ही पक्ष सध्या विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी पेहराव बदलण्यापासून तयारी केल्याचं दिसून आलं. गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी गाडी आणि माहोल गुलाबी करुन ते सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सर्वत्र जागृती करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना या गुलाबी रंगाचा फायदा होईल का, विधानसभेला महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होईल का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी त्यांच्यास्टाईलने उत्तर दिले. शरद पवारांना हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यामुळे, तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का, असा प्रतिप्रश्न विचारत शरद पवारांनी मिश्कील टोला लगावला, त्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. तसेच, अजित पवारांच्या बदलत्या रंगाच्या भूमिकेचा त्यांना फायदा होणार नाही, असेच पवारांनी सूचवलं आहे.    

मराठा आरक्षणावरही भूमिका स्पष्ट

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी. या सर्वपक्षीय बैठकीला मनोज जरांगे पाटील यांना बोलवावं. छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनाही बैठकीला बोलवावं.  50 टक्क्यावर आरक्षण देता येणार नाही असा कोर्टाने निर्णय दिला आहे. पण तामिळनाडूमध्ये 73 टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिले होते. हे धोरण बदललं पाहिजे 50 टक्क्यावर आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राचा आहे, त्याला आमचं पूर्ण सहकार्य असणार. जरांगे यांनी मुस्लिम, धनगर यांच्या आरक्षणाचाही मुद्दा मांडला, समाजात नाराजी होती ती दूर झाली आहे, असं शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणासाठी पर्याय काय आहे? यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मी सूचवले सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यात सरकारची जी भूमिका राहील त्याला आमचा पाठींबा असेल. आम्ही सरकार बरोबर असू. ⁠या बैठकीला मनो जरांगे यांना पण बोलवावे. ओबीसी नेते आंदेलक यांना ही बोलवावे. या संयुक्त बैठकीत मार्ग काढावा.  त्याच अडचण येण्याची एक शक्यता आहे. 50 टक्यांच्यावर आरक्षण देता येत नाही. ⁠त्यासाठी हे धोरण बदलावे लागेल आणि याचा आधिकार केंद्र सरकारकडे आहे.  केंद्र सरकारला यासाठी आमचे पूर्ण सहकार्य राहील.

व्हिडिओ - मग लगेच महिला अट्रॅक्ट होतील का? गुलाबी जॅकेटवरुन टोला

हेही वाचा

मोठी बातमी : तुम्ही राज ठाकरेंची गाडी अडवायला लावली का, थेट प्रश्नावर शरद पवारांचं रोखठोक उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सRajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर, Fact Checkमध्ये काय आढळलं? 
Fact Check : 26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर
Embed widget