बिहारमध्ये मोठी घडामोड, भाजप बहुमतापासून दूर, नितीश कुमारांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट नाकारली
Lok Sabha Elections Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असताना भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत गाठणे कठिण झाले आहे. त्यामुळे देशात राजकीय घडामोडींना वेग आलाय.
Lok Sabha Elections Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असताना भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत गाठणे कठिण झाले आहे. त्यामुळे देशात राजकीय घडामोडींना वेग आलाय. बिहारमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री यांनी नितीश कुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट नाकारली आहे. नितीश कुमार यांनी भेट नाकारल्याने चर्चेला उधाण आलंय. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर नितीश कुमार यांची भूमिका निर्णायक ठरणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, NDA च्या नेत्यांनी उद्या दिल्लीत बैठकीचे आयोजन केले आहे. भाजपकडून घटक पक्षांच्या नेत्यांना संपर्क करण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय उद्याच्या बैठकीस निमंत्रण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
देशात 298 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आघाडी घेतली आहे. यातील 242 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडीने 226 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भाजपच्या मित्र पक्षांनी साथ सोडली तर इंडिया आघाडीची सत्तेची दारं खुली होऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. नितीश कुमारांनी भाजपची सात सोडली तर इंडिया आघाडीत सत्तेत येऊ शकते , असे बोलले जात आहे. शिवाय, इंडिया आघाडीकडून नितीश कुमारांना उपपंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसतोय. कारण भाजपच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये कमी होताना दिसत आहेत. भाजपने युपीमध्ये 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने 32 जागांवर मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पक्षानेही 7 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशला मोठा धक्का बसताना दिसतोय.
बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आघाडीवर
उत्तर प्रदेशनंतर उत्तर भारतातील आणखी महत्वाचे राज्य असणाऱ्या बिहारमध्येही भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत. जनता दिल युनायटेडने 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पक्षाने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवाय लोक जनशक्ती पार्टीचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये काँग्रेस पक्षाची केवळ 1 जागा आघाडीवर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसला प्रतिसाद मिळालेला नाही.
गुजरातचा गड भाजपने राखला
गुजरातमध्ये यंदाही भाजपचा डंका पाहायला मिळतोय. भाजपने गुजरातमध्ये 23 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. शिवाय अमित शाहांनी गांधीनगरमधून विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे गांधीनगरमधून अमित शाह यांचा विजय निश्चित मानला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या