जनतेने गोडसेंना निवडले, त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले; मी मंत्री झालो : नितीन गडकरी
Nitin Gadkari, Nashik Meeting : नाशिक व परिसरात सुरू केलेली काम आज प्रगतीपथावर आहेत. जे साठ वर्षात काँग्रेसच्या काळात झालं नाही ते दहा वर्षात झालं.
Nitin Gadkari, Nashik Meeting : "नाशिक व परिसरात सुरू केलेली काम आज प्रगतीपथावर आहेत. जे साठ वर्षात काँग्रेसच्या काळात झालं नाही ते दहा वर्षात झालं. याचा श्रेय ना गोडसेंना, ना मला, ना मोदींना नाही, तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेचं आहे. जनतेने गोडसेंना निवडल्यानंतर मोदी पंतप्रधान झाले आणि ते पंतप्रधान झाले म्हणून मी मंत्री झालो त्यामुळे हे सगळं श्रेय जनतेचं आहे", असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. नाशिकमधील महायुतीच्या सभेत ते बोलत होते.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, नाशिक शहर महाराष्ट्रात सर्वोत्तम प्रगती केलेलं शहर आहे. नाशिकपासून समृद्धी पर्यंतच टेंडर निघालं आहे. या कामाची सुरुवात निवडणुकीनंतर होईल. भुजबळ साहेबांच्या मागणीनंतर हे काम पूर्ण होतय. देशभरात अनेक रस्त्यांची काम वेगाने सुरू तर अनेक काम पूर्ण झाली. या सगळ्या रस्त्यांच्या कामात नाशिक जिल्ह्यात 5000 कोटींची कामे झाली. यामुळे सोलापूर ते नाशिक अंतर 120 किलोमीटरने कमी होईल.
काँग्रेसने केलं नाही ते दहा वर्षात मोदींनी करून दाखवलं
नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, कम्युनिस्ट पार्टीला संपविण्याच काम कोणी केल असेल तर ते बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. कम्युनिस्ट पार्टी संपली. समाजवादी संपले. काँग्रेसमधून अनेक पार्ट्या झाल्या. अनेक चिन्ह बदलले सगळे केलं, मात्र 60 वर्षात जे काँग्रेसने केलं नाही ते दहा वर्षात मोदींनी करून दाखवलं. देशात पैशाची कमी नाही मात्र इमानदारीने काम करणारा माणूस पाहिजे. या देशाला रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक नीतीची गरज आहे. आम्ही केलेल्या प्रत्येक योजनेत गरिबाचे हित पाहिलं.
देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही
छत्रपती शिवाजी महाराजांसारखी शिवशाही आम्हाला देशात स्थापन करायची आहे. राम मंदिर बांधणे हे आमचं उद्दिष्ट नव्हे. तर या देशात राम राज्य आणायच आहे. या देशाला विश्वगुरू करायचं आहे. गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या योजना मोदींच्या नेतृत्वात आणल्या. त्या आधारावर देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही, असेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या