परिक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा, नितेश राणेंची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
Nitesh Rane, Mumbai : परिक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा, नितेश राणेंची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
Nitesh Rane, Mumbai : "माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचं परिपत्रक आहे. असं लांगूलचालन चालणार नाही, अशी भूमिका शिक्षण मंत्र्यांकडे मांडली आहे. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली", असे मंत्री नितेश राणे म्हणाले. ते मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.
इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये - नितेश राणे
नितेश राणे म्हणाले, लांगुलचालन मान्य नाही. हा निर्णय 2024 सालचा आहे. हे निर्णय रद्द करण्यासाठी मागणी केली.
परीक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमके तेच विद्यार्थी परीक्षेला आहेत का? हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये. विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असं परिपत्रक काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा,
असंही राणे म्हणाले.
ओवैसीला दुरुन बघितलं तर उद्धव ठाकरे दिसतो - नितेश राणे
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, हिंदुत्व राजकीय अजेंडा असू शकत नाही. हिंदुत्व मतं मिळवण्याचा प्रश्नच नाही. हिंदू द्वेष सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचा आवडता विषय आहे. सिद्धिविनायक न्यासाचा निर्णय चांगली गोष्ट आणि कौतुकास्पद आहे. सिद्धिविनायक मंदिरच्या निर्णयाचे इतरांनी अनुकरण करावे. उबाठा गट ही मुस्लिम लीग आहे. ओवैसीला दुरुन बघितलं तर उद्धव ठाकरे दिसतो. जवळ आलं तर लक्षात येतं हा तर ओवैसी आहे. ओवैसी आणि उबाठामध्ये काही फरक नाही. ओवैसी आणि उबाठा म्हणजे करण अर्जुन आहेत.
नितेश राणे काय काय म्हणाले?
माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे
असं लांगुलचालन चालणार नाही अशी भूमिका शिक्षण मंत्र्यांकडे मांडली
बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत
याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI