NCP MLA disqualification case :राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचीच, 41 आमदार पात्र, सर्व आमदारांची यादी!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवाताना राहुल नार्वेकर यांनी पक्षघटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली.
NCP MLA disqualification case : विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अजित पवार यांचाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. महिनाभरात राहुल नार्वेकर यांनी हा मोठा निर्णय दिला. (Rahul Narwekar verdict)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवाताना राहुल नार्वेकर यांनी पक्षघटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अश्यावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे, असे नार्वेकर म्हणाले. आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. पक्षाचा अध्यक्ष मी ठरवू शकत नाही. त्यामुळे विधिमंडळ बहुमतावर पक्ष कुणाचा हा निर्णय द्याला लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, आमदारही पात्र -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार पात्र ठरतील. शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली.
पात्र ठरणारे 41 आमदार कोणते ?
१.सरोज अहिरे
२.धर्माबाबा आत्राम
३.बाळासाहेब अजबे
४.राजू कारेमोरे
५.आशुतोष काळे
६.माणिकराव कोकाटे
७.मनोहर चांद्रिकेपुरे
८.दीपक चव्हाण
९.संग्राम जगताप
१०.मकरंद पाटील
११.नरहरी झिरवाळ
१२.सुनील टिंगरे
१३.अदिती तटकरे
१४.चेतन तुपे
१५.दौलत दरोडा
१६.राजू नवघरे
१७.इंद्रनील नाईक
१८.मानसिंग नाईक
१९.शेखर निकम
२०.अजित पवार
२१.नितीन पवार
२२.बाबासाहेब पाटील
२३.अनिल पाटील
२४.राजेश पाटील
२५.दिलीप बनकर
२६.अण्णा बनसोडे
२७.संजय बनसोडे
२८.अतुल बेनके
२९.दत्तात्रय भरणे
३०.छगन भुजबळ
३१.यशवंत माने
३२.धनंजय मुंडे
३३.हसन मुश्रीफ
३४.दिलीप मोहिते
३५.निलेश लंके
३६.किरण लहमते
३७.दिलीप वळसे
३८.राजेंद्र शिंगणे
३९.बबनराव शिंदे
४०.सुनील शेळके
४१.प्रकाश सोळंके
आणखी वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय!