राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा
NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितलं.
NCP MLA disqualification case मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष (NCP) कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं हा एकमेव निकष महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणात (NCP MLA disqualification case) निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितलं. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजितदादांनी जिंकली आहे.
Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar decides that Ajit Pawar faction is the 'real NCP' political party. Decision was based on the factor of legislative majority. pic.twitter.com/HH6ab2jDVl
— ANI (@ANI) February 15, 2024
राहुल नार्वेकर काय म्हणाले? (Rahul Narwekar verdict)
मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे.
शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचीच आहे.
अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा
आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.
दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका
शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही. नेतृत्व रचना, पक्षीय घटना आणि विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल.यामध्यो पक्षीय घटना व नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही.
अजित पवारांकडे 41 आमदारांचं बळ, सर्व आमदार पात्र
विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. राष्ट्रीय कार्यकारणीनं निवडल्यानं अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी.
अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र. सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत. नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही.
अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही.
शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळल्या. अजित पवार गटाच्या याचिकाही फेटाळल्या. कुणीही अपात्र नाही
संबंधित बातम्या