एक्स्प्लोर

Rupali Chakankar: बेडकाला छाती फुगवली की बैल झाल्यासारखं वाटतं; रुपाली चाकणकरांची अमोल कोल्हेंवर बोचरी टीका

Kolhapur News: पाच वर्षात घरासमोरचा रस्ता नीट करता आला नाही, बेडकाला छाती फुगवून बैल झाल्याचा भास होतोय, अशी खरमरीत शब्दांत रुपाली चाकणकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांना लक्ष्य केले. अमोल कोल्हे काय प्रत्युत्तर देणार?

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिरुर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांचा उमेदवार कोण असणार, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीकडून शिरुरमध्ये शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनाच पुन्हा रिंगणात उतरवले जाऊ शकते. अमोल कोल्हे हे शिरुरचे (Shirur Loksabha) विद्यमान खासदार आहेत. याच मुद्द्यावरुन आता अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अमोल कोल्हे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघासंदर्भात केलेले दावे म्हणजे बेडकाने छाती फुगवण्याचा प्रकार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. त्या शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. शिरुरमध्ये महायुतीला उमेदवार मिळत नाही, ही अमोल कोल्हे यांची भाषा हास्यास्पद आहे. बेडकाने छाती फुगवली की त्याला बैल झाल्यासारखे वाटते, असा हा प्रकार आहे. शिरुर मतदारसंघात कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता नाटकाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अमोल कोल्हे यांना स्वत:च्या घरासमोरचा रस्ताही गेल्या पाच वर्षात नीट करता आला नाही. तरीही त्यांच्या इतका आत्मविश्वास येतो कुठून, हाच प्रश्न मला पडल्याचे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले.

अजितदादांचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी निवडून येईल: चाकणकर

अजितदादांना लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या जागा मिळतील, त्या सर्वठिकाणी लवकरच उमेदवार जाहीर केले जातील. दादांची सर्व यंत्रणा तयारीला लागलेली आहे. विरोधकांनी कोणताही उमेदवार दिला तरीही प्रत्येक ठिकाणी अजित पवारच उभे आहेत, असे समजून आमच्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील, अशा विश्वास रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.


बारामतीत सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील: रुपाली चाकणकर

यावेळी रुपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केले. प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. निवडणूक  लढवावी किंवा लढवावी ते त्यांच्या कर्तुत्वानुसार ठरते. विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. बारामतीची लढाई नणंद विरुद्ध भावजई अशी वाटत नाही. कारण गेली 15 वर्षे आम्ही सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम केले आहे. एकाच जागेवर सातत्याने सुप्रिया सुळे यांना संधी का मिळावी? सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघात अतिश्य चांगल्याप्रकारे काम केले आहे. 15 वर्षांनी जनता नव्या नेतृत्त्वाला संधी देऊ शकते, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी! शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करुनही अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार, अजित दादांच्या विश्वासू नेत्याचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget