Navneet Kaur Rana Amravati Lok Sabha : मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही, अमरावतीतील पोस्टरबाजीने नवनीत राणांची डोकेदुखी वाढली
Navneet Kaur Rana, Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
Navneet Kaur Rana, Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघात अज्ञात लोकांनी "मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही",अशी पोस्टरबाजी करत नवनीत राणांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. खासदार राणा (Navneet Rana) भाजपकडून निवडणूक लढणार, अशी माहिती अमरावती लोकसभा मतदारसंघात पसरली. त्यानंतर सायंकाळी राणांविरोधात ही पोस्टरबाजी करण्यात आली.
राणा यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट
नवनीत राणा (Navneet Rana) यांचे पती रवी राणा यांनी गुरुवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रवी राणा फडणवीस यांची भेट घेण्यासाठी तातडीने नागपूरला रवाना झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये ही भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये 2 तास चर्चा देखील झाली होती. दरम्यान, या भेटीमध्ये कोणती चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नसले तरी लोकसभा निवडणुकीबाबतचं ही भेट होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
अमरावतीच्या जागेबाबत शिंदेगट आग्रही
नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपला नेहमीच पाठिंबा दिला. शिवाय, आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी त्या इच्छुक आहेत. मात्र, भाजपचे या मतदारसंघात काम नाही. राणा निवडून येण्यापूर्वी अमरावतीत शिवसेनेचं वर्चस्व होतं. शिवाय शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुनच नवनीत राणा निवडून आल्या होत्या. त्यामुळे शिंदेंची शिवसेना या जागेबाबत आग्रही आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना ही जागा भाजपकडून लढवायची असल्याचे बोलले जात आहे.
निवडून आल्यानंतर राणांचा नेहमीच भाजपला पाठिंबा
खासदार नवनीत राणा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवणीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे भाजपला पाठिंबा दिला. लोकसभेतही प्रत्येकवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय, महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना त्यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप पुरस्कृत भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या