एक्स्प्लोर

Nashik Teachers constituency election 2024: वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था! नाशिकमधून माघारीनंतर राधाकृष्ण विखेंच्या भावाची फेसबुक पोस्ट व्हायरल

Maharashtra Politics: राधाकृष्ण विखे पाटील यांनी भावाची समजूत घालून त्याला नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घ्यायला भाग पाडले होते. पण आता राजेंद्र विखे-पाटील नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्यानिमित्ताने दररोज नवीन रंजक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी येत्या 26 जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. यापैकी नाशिक शिक्षक मतदारसंघातून (Nashik Teacher constituency) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचा मार्ग काहीसा सुकर झाला होता. परंतु, त्यानंतर काहीवेळातच राजेंद्र विखे-पाटील (Rajendra Vikhe Patil) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राजेंद्र विखे-पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक शायरी लिहली आहे. ही शायरी अत्यंत सूचक मानली जात आहे. "शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोका खा गया; वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था!", असे या शायरीत म्हटले आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीबाबत राजेंद्र विखे- पाटील यांना अनपेक्षित असे काही घडले का? त्यांना ऐनवेळी माघार घ्यायला लागल्याने ते नाराज आहेत का? त्यांच्या या नाराजीचा रोख कोणाच्या दिशेने आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

नाशिक शिक्षक मतदारसंघात नेमकं काय घडलं?

भाजपचे नेते  राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत राजेंद्र विखे पाटील यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापूर्वी त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतूनही माघार घ्यावी लागली होती.  काल शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी अर्ज माघारी घेण्यासंदर्भात  राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे याच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. यानंतर राजेंद्र विखे यांनी शेवटच्या क्षणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रतिनिधी पाठवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यापूर्वी त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय सांगितले, याचा तपशील मात्र उपलब्ध झालेला नाही. परंतु, उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर काहीवेळातच राजेंद्र विखे यांनी अचानक फेसबुकवर ही पोस्ट शेअर करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील काही बोलणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

नाशिक शिक्षक मतदारसंघात तिहेरी लढत

नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे  गटाचे संदीप गुळवे हे उमेदवार असतील. तर त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवार असतील. याठिकाणी महायुतीच्या दोन उमेदवारांमध्येच लढत पाहायला मिळत आहे. 

आणखी वाचा

विधानपरिषदेच्या लढतीचं चित्र स्पष्ट, मुंबई आणि कोकण पदवीधरमध्ये थेट लढत, नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget