एक्स्प्लोर
War of Words: 'मग तुम्ही काय हलवताय?', कर्जमाफीवरून Uddhav Thackeray यांचा Ajit Pawar यांना टोला.
मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) वक्तव्यावरून जोरदार टीका केली. 'शेतकऱ्यांनी सारखंच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये', असे वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांनी केले होते. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, 'तुम्ही अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगत आहात, मग तुम्ही काय करताय?' असा सवाल केला. ज्या शेतकऱ्याला आपत्तीमुळे कपाळावर हात मारायची वेळ आली आहे, त्याला तुम्ही हातपाय हलवायला सांगता, मग तुम्ही सरकार हलवताय ना? असा टोलाही त्यांनी लगावला. महायुती सरकारने निवडणुकीसाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण आता शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, असा आरोपही ठाकरेंनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















