एक्स्प्लोर

लोकसभेसाठी छगन भुजबळांकडून दबावतंत्र? कुटुंबातून एकाला संधी द्या, नाहीतर भाजपमधून लढू, वरिष्ठांना थेट इशारा

Nashik Lok Sabha: भाजपकडून लोकसभेसाठी माधव पॅटर्नचा (माळी, धनगर, वंजारी) अवलंब करावा, याचा निवडणुकीत फायदा नक्कीच होऊ शकतो, अशी भावना भुजबळांची आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सध्या इच्छुकांमध्ये चुरस वाढल्याचं दिसत आहे. तसेच, तिकीट मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांचीही धडपड सुरू असल्याचं पाहत आहे. यापैकीच एक मोठं नाव म्हणजे, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal). लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून वरिष्ठांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भुजबळ कुटुंबातून एकाला संधी मिळावी, अन्यथा भाजपमधून (BJP) निवडणूक लढू, असा इशारा वरिष्ठांना भुजबळांनी दिल्याचं समजतंय. 

भुजबळ यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) दबावतंत्राचा वापर केल्याची सूत्रांची माहिती आहे. भुजबळ कुटुंबातून एकाला संधी मिळावी अन्यथा भाजप मधून निवडणूक लढू असा इशारा भुजबळांनी पक्षाच्या नेतृत्वाला दिल्याचं समजतंय. भाजपकडून लोकसभेसाठी माधव अर्थात माळी, धनगर, वंजारी पॅटर्नचा अवलंब केला जातोय, याचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी भुजबळांची भावना आहे. नाशिक मधून लढण्यासाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे देखील इच्छुक आहेत. 

भाजपकडून लोकसभेसाठी माधव पॅटर्नचा (माळी, धनगर, वंजारी) अवलंब करावा, याचा निवडणुकीत फायदा नक्कीच होऊ शकतो, अशी भावना भुजबळांची आहे. तर पक्षातील एका गटाची ओबीसी मराठा आरक्षण वादामुळे भुजबळांना उमेदवारी दिल्यास फटका बसू शकतो, असं मत आहे. 

नाशिकमधून लढण्यासाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे देखील इच्छुक आहेत. नाशिक लोकसभेच्या अनुषंगानं पुण्यात आज जिल्ह्यातील आमदारांच्या बैठकीचं अजित पवार यांच्याकडून आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या पुण्यातील बैठकीत नाशिक लोकसभेबाबत तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही, 1 टक्कासुद्धा नाही : छगन भुजबळ 

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी छगन भुजबळ पुण्याला रवाना झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "पुण्याला राष्ट्रवादीची बैठक आहे. ज्या जागा आम्हाला मिळणार आहेत किंवा शक्यता आहे, कार्यकर्त्यांची कितपत तयारी आहे, जिंकण्याची किती शक्यता आहे, या यासंदर्भात बैठक घेतली जात आहे. पक्षाचा नेता म्हणून अजितदादा आढावा घेणार आहेत. दिल्लीत माझ्या नावाववर चर्चा झाली याबाबत मला कल्पना नाही, मी पुण्याला गेल्यावर विचारतो. जे दिल्लीला गेले होते, त्यांना जाऊन विचारतो. अनेक इच्छूक आहेत. आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही, 1 टक्कासुद्धा नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहोत, पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याला जागा सुटेल, तो लढेल. ज्या गटाचा उमेदवार असेल, त्याला 100 टक्के निवडुन आणणार."

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबात आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक 

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी छगन भुजबळ पुण्याला रवाना झाले आहेत. छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे समर्थक आणि पदाधिकारीही रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती? छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्यानं किती फायदा किंवा तोटा होऊ शकतो, तसेच, मराठा समाजानं भुजबळांविरोधात भूमिका घेतली तर त्याचा किती फटका बसू शकतो? यासर्व विषयांवर चर्चा होणार होणार आहे. 

पाहा व्हिडीओ : Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून वरिष्ठांवर दबावतंत्राचा वापर? भाजपकडून उमेदवारी घेण्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget