एक्स्प्लोर

राहुल गांधी यांच्या कृपेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा राहू काळ सुरु : नरेश म्हस्के

Naresh Mhaske, Delhi :काँग्रेसचा हात , ज्या पक्षावर पडतो, तो उभा राहत नाही, संपतो, अशी टीका म्हस्के यांनी केली.

Naresh Mhaske, Delhi : "मागच्या सत्रात म्हणालो होतो की राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे त्यांचा राहू काळ सुरू झाला आहे. आणि आता त्यांच्या कृपेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचाही राहू काळ सुरू झाला आहे", असं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते. 

नरेश म्हस्के म्हणाले, काँग्रेसचा हात , ज्या पक्षावर पडतो, तो उभा राहत नाही, संपतो. उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी त्यांची मशाल काँग्रेसच्या हाती दिली, त्या दिवशीच त्या मशालीच्या आगीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वालाही जाळलं. त्याचा परिणाम असा झाला की आज त्यांना काँग्रेसच्या मतदारांवर अवलंबून राहावं लागत आहे.

दुसरीकडे, आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनुष्यबाण अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 80 लाख लोकांनी शिवसेनेला मत दिलं, कारण आम्ही हिंदुत्व वाचवण्याचं काम केलं आहे. याशिवाय, संविधानाने दिलेली जबाबदारी, लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, आपला दवाखाना, समृद्धी महामार्ग आणि कोस्टल रोड अशा योजनांद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

2014 ते 2024 दरम्यान बँकांच्या शाखांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. मार्च 2014 मध्ये एकूण 1,17,990 शाखा होत्या, ज्यांची संख्या आता 1,65,501 वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील शाखांची संख्या 41,855 वरून 55,372 झाली आहे. सेमी-अर्बन शाखा 32,504 वरून 45,314 पर्यंत वाढल्या, तर शहरी भागातील शाखा 21,007 वरून 29,276 वर गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक समावेशन अधिक मजबूत झाले आहे.

पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, आज 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून थेट त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात, जे कॅनडा आणि फ्रान्सच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थांना बळकटी मिळाली असून, 137 कोटी आधार क्रमांकांद्वारे प्रत्येक भारतीयाला डिजिटल ओळख देण्यात आली आहे.

आज भारत जागतिक स्तरावर आर्थिक प्रगतीचा ध्रुवतारा बनला आहे, रोजगारनिर्मितीतून नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, आणि ग्रामीण-शहरी भागांतील अंतर कमी कलं आहे. काँग्रेसने भारतावर राहु काळ आणला होता, पण महायुती आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहे. काँग्रेसच्या काळात ज्या जागतिक व्यासपीठावर भारताला दुर्लक्षित केलं जात होतं, त्या व्यासपीठावर आज भारत एक मजबूत, आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. महायुतीने देशाला राहु काळातून बाहेर काढून सशक्त आणि समृद्ध भारत उदयास आणला आहे, असंही म्हस्के म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे प्रेत; मृत्यूचं मोठं कारण समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale Full PC : महायुतीतून बाहेर पडणार? आठवले म्हणातात..जायचं कुठे हा प्रश्न आहे!Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Embed widget