Narendra Modi Interview : काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस; पंतप्रधान मोदींचा छातीठोक दावा
Narendra Modi Interview : "निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे 5 दशकांचे काम आणि माझे 10 वर्षांचे काम पाहा.
Narendra Modi Interview : "निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे 5 दशकांचे काम आणि माझे 10 वर्षांचे काम पाहा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा. आमच्यात काही कमी असेल पण आमच्या प्रयत्नात कोणतीही कमी नाही. माझे 2 वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. तरिही आम्ही सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकास केला. काँग्रेसच्या मॉडेलपेक्षा आमचे रस्ते चांगले आहेत", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एएनआय वृत्तसंस्थेला पीएम मोदींनी मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
माझे निर्णय कोणाला भीती घालण्यासाठी नसतात
नरेंद्र मोदी म्हणाले, कुटुंबाला मजबूत करण्यासाठी ते ताकद लावतात. मी देशाला मजबूत करण्यासाठी काम करतोय. देश मजबूत झाला तर लोकांना समाधान मिळते. 2024 मध्ये निवडणुकीचे मैदान आहे तर आम्ही आमचे कामे सांगतो. कोणालाही घाबरण्याची गरज नसते. माझे निर्णय कोणाला भीती घालण्यासाठी नसतात, तर जनतेचे कल्याण करण्यासाठी असतात. अनेक सरकार म्हणतात आम्ही सर्वकाही केलं. पण मी मानत नाही की, मी सर्वकाही केले. आम्ही फक्त भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला आहे. मी म्हणतो जे झालयं तो फक्त ट्रेलर आहे.
पुढील 25 वर्षांचे माझे प्लॅनिंग आहे
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मी अनेक वर्ष मुख्यमंत्री होतो. सातत्याने निवडणुका आचारसंहिता लागू होतात. माझ्या राज्यातील मोठे अधिकारी निवडणुकीच्या कामाला जातात. त्यामुळे मी अधिकारांना अगोदरच काम देतो. निवडणुकांसाठी 100 दिवस अगोदर पासून प्लॅन तयार केला आहे. मी 15 लाख लोकांचे मत ऐकले की, पुढील काळात भारत कसा झाला पाहिजे? मी तंत्राज्ञाचा उपयोग केला. पुढील 25 वर्षांचे माझे प्लॅनिंग आहे.
मी 100 वर्षात कलम 370 चा निर्णय घेतला
मी निती आयोगाची मीटिंग बोलावतो. त्यांच्याशी चर्चा करतो. मी तीन टप्प्यांमध्ये काम करणार आहे. भाजपचा जाहिरनामा राबवायचा आहे. सगळकाही मलाच समजत असं नाही. मी एक मिनीट पण वाया घालवू इच्छित नाही. मी 100 वर्षात कलम 370 चा निर्णय घेतला. तिहेरी तलाक बाबत कायदा केला. प्राण्यांचेही लसीकरण केले, असेही मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय चिखलात फुटीर घराण्यांचा सुळसुळाट, पोरगा एका पक्षात तर वडिल दुसर्याच पक्षात, नवरा एका पक्षात तर बायको तिसऱ्या पक्षात