दक्षिण भारतात किती आव्हान ? एनडीए किती जागा जिंकणार? पीएम मोदींनी आकडेवारी सांगितली
Narendra Modi on Loksabha Election : आमची रणनिती संपूर्ण देशात एकच आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद नाही, असा समज विरोधकांनी निर्माण केलाय.
Narendra Modi on Loksabha Election : "आमची रणनिती संपूर्ण देशात एकच आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद नाही, असा समज विरोधकांनी निर्माण केलाय. पण भाजप दक्षिण भारतात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. 4 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकेल. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असून आम्ही 400 चा आकडा पार करु", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पीटीआय वृत्तसंस्थेला पीएम मोदींनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हा दावा केलाय.
भाजप हा शहरी पक्ष असल्याचे नेरेटिव्ह चालवले गेले
नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही संपूर्ण देशासाठी एकच रणनिती आखत आहोत. आमची रणनिती आहे की, 4 जून रोजी 400 पार झाले पाहिजे. वर्षानुवर्षे आपल्या देशात काही बाबी गृहित धरल्या जातात. पहिल्यांदा भाजप हा शहरी पक्ष असल्याचे नेरेटिव्ह चालवले गेले. पण तुम्ही पाहा भाजप ग्रामीण भागातील पक्ष आहे.
भाजप हा उत्तर भारतातील पक्ष असा नेरेटिव्ह चालवला जातोय
पुढे बोलताना मोदी म्हणाले, सध्या भाजप हा उत्तर भारतातील पक्ष असा नेरेटिव्ह चालवला जातोय. पण गुजरात उत्तर भारतात नाहीये. गुजरातमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आमची सत्ता आहे. महाराष्ट्रातही आम्ही अनेकदा सत्तेत राहिलो आहोत. कर्नाटकातही आमच्याकडे सत्ता होती. आंध्रप्रदेशमध्येही आम्ही पार्टनर होतो.
भाजपबद्दल भ्रम पसरवण्यात आलेत
भाजपबद्दल भ्रम पसरवण्यात आलाय. भारतीय जनता पक्ष पुरुषसत्ताक विचारांचा असल्याचे बोलले जाते. पण आमच्या पक्षात सर्वांत जास्त महिला खासदार आहेत. त्यानंतर आमचा पक्ष ब्राम्हण आणि बनियांचा पक्ष असल्याचे बोलले गेले. पण आमच्याकडे सर्वांत जास्त दलित खासदार आहेत. आता दक्षिण भारतात भाजप नाही, असे नेरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. पण दक्षिण भारतात भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे.
VIDEO: PM Modi (@narendramodi) in an exclusive conversation with PTI (@PTI_News).
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2024
“I have not spoken a word against minorities. I am speaking against the vote bank politics of Congress. I am speaking on the Congress working against the Constitution. The Constitution makers of… pic.twitter.com/DwVr5aNs65
इतर महत्वाच्या बातम्या