Rane vs Raut : ...तर रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने मारतील : नारायण राणे
Rane Vs Raut : उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे, त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडपतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली.
Rane Vs Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबयाचं नाव घेत नाही. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे, त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली. तसंच संजय राऊत जिथे बोलावतील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार आहे, असंही त्यांनी म्हटलं. नारायण राणे मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलत होते.
रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे हे संजयला चप्पलेने मारतील
एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. कशासाठी माहित आहे का? मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत येऊन माझ्या बाजूला बसायचा आणि उद्धव ठाकरे तसंच रश्मी ठाकरे यांच्याबाबत जे काही सांगायचा ना ते उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी संजयला चप्पलेने नाही मारलं तर मला विचारा, अशी टीका राणे यांनी केली.
'संजयने ज्यांच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा'
"शिवसेना संपवण्याची सुपारी मी नाही तर संजय राऊतने घेतली आहे. शिवसेना संपवली याचा त्याला आनंद होत आहे," असा दावा नारायण राणे यांनी केला. "हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे. संजयने ज्यांच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही संजय राऊतबद्दल विचारु नका, असं राणे म्हणाले.
जिथे बोलावशील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार; राणेंचं राऊतांना आव्हान
जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर नारायण राणे म्हणाले की, "मी मला सुरक्षा मागितलेली नाही. मला आज नाही तर 1990 पासून संरक्षण आहे. तेव्हा तो शिवसेनेत नव्हता. तो शिवसेनेविरुद्ध लोकप्रभामध्ये लेख लिहित होता. पण आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलावशील तिथे मी सर्व सुरक्षा सोडून यायला तयार आहे."
'संजय राऊत हे राजकारणातले जोकर'
आजच्या राजकारणाला हा जोकर आहे. शिव्या घालण्यापलीकडे तो काही करत नाही. त्याने सामाजिक आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही, असं नारायण राणे म्हणाले.