Nana Patole : 'इकडे जवान शहीद होतायेत, अन् मोदी विदेशवारीला'; जम्मू काश्मीरवरून नाना पटोलेंचा घणाघात
Nana Patole on PM Narendra Modi : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
![Nana Patole : 'इकडे जवान शहीद होतायेत, अन् मोदी विदेशवारीला'; जम्मू काश्मीरवरून नाना पटोलेंचा घणाघात Nana Patole criticizes PM Narendra Modi over Jammu and Kashmir attack Marathi News Nana Patole : 'इकडे जवान शहीद होतायेत, अन् मोदी विदेशवारीला'; जम्मू काश्मीरवरून नाना पटोलेंचा घणाघात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/c28874606f3d256255b1d0fd9d240cb01720516625027923_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nana Patole : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवाद्यांच्या हल्ल्यात (Terrorists Attack) पाच जवान शहीद झाले आहेत. कठुआ येथे हा दहशतवादी हल्ला झाला असून यात पाच जण जखमीही झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच वरळी हिट अँड रन केसवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही हे राहुल गांधी या आधी सुद्धा बोलले आहेत. मोदी विदेशवारीला आहेत आणि इकडे जवान आपले शहीद होत आहेत. राजनाथ सिंह मागील अनेक वर्षांपासून एकच बोलतात की जशाचं तसं उत्तर देऊ, मोदी यांनी या सगळ्यावर उत्तर द्यावं, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच राज्याचा बजेटला मान्यता दिली जाईल. पुरवणी मागण्या सूरु होतील. 94 हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सरकार आणत आहे. राज्याला लुटण्याचा काम राज्य सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
हिट अँड रन प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
वरळी हिट अँड रन केसबाबत नाना पटोले म्हणाले की, काल पूर आला होता. मुख्यमंत्री अजून आढावा घेताय. ते अजून विधानसभेमध्ये आलेले नाहीत. अजून मुख्यमंत्री या आरोपीच्या शोधात आहेत का? हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत. गुजरातहून येणारा ड्रगचा वापर तरुणाई करत आहे. नशेचे राज्य आपले होत आहे आणि तरुण अपराध करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला
अजितदादा सध्या इमेज बिल्डवर अधिक खर्च करतात. बॉक्स नावाच्या कंपनीला त्यांनी केवळ इमेज बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट दिलंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. यावर नाना पटोले म्हणाले की, ज्यांची पद गेली त्यांना आता इमेज बिल्डिंगसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. या पॉलिटिकलं कॅम्पनरची दुकानं असतात ते फक्त निवडणुकापुरते सोबत असतात, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)