एक्स्प्लोर

राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी, आशिष देशमुख काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात सक्षम नेते असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बाहेरचा उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये खदखद वाढली आहे. आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार आहेत.

नागपूर : राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं आशिष देशमुख म्हणाले. काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार असला तरी काँग्रेसमध्ये राहून पक्षाचं काम करणार असल्याचं देशमुख यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात राज्यसभेसाठी अनेक सक्षम नेते असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खदखद वाढली आहे. बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा काँग्रेस प्रदेश महासचिव आशिष देशमुख देणार आहेत. भाजप सोडून, आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आशिष देशमुख यांना राज्यसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु ते पाळलं गेलं नाही, असा दावा आशिष देशमुख यांनी केला.

इम्रान प्रतापगढी जे स्वतः कव्वाल, शायर आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या पक्षाच्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा, असा खोचक सल्लाही आशिष देशमुख यांनी दिला. आपण महासचिव पदाचा राजीनामा देणार असला तरी पक्ष सोडणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले असून महाराष्ट्रातून कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत इम्रान प्रतापगढी?

  •  उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय मुस्लिम तरुण चेहरा 
  • उर्दू कवी अशीही ओळख 
  • कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष
  • कॉंग्रेसमधील राहुल गांधी यांच्या तरुण फळीतील विश्वासू सहकारी
  • उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्याबरोबर प्रचार केला

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भातील शाळा 30 जून रोजीच सुरु होणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, शिक्षण विभागालाही सुनावलं
विदर्भातील शाळा 30 जून रोजीच सुरु होणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, शिक्षण विभागालाही सुनावलं
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Nagpur: नागपूरमध्ये 20 कोटींचा अक्षरशः चुराडा! 23 वर्षानंतरही क्रीडा संकुल अर्धवटच; फुटबॉल स्टेडियम ते टेनिस कोर्टमध्ये कचरा अन् भंगारचे ढीग, खेळाडूंचं स्वप्नं धुळीला मिळालं
नागपूरमध्ये 20 कोटींचा अक्षरशः चुराडा! 23 वर्षानंतरही क्रीडा संकुल अर्धवटच; फुटबॉल स्टेडियम ते टेनिस कोर्टमध्ये कचरा अन् भंगारचे ढीग, खेळाडूंचं स्वप्नं धुळीला मिळालं
Vidhan Parishad Election 2026 BJP: विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget