एक्स्प्लोर

Eknath Shinde :अजित पवार म्हणाले उद्धव ठाकरेंच्या जागाही आम्ही लढवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde : आगामी लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या जागाही आम्ही लढवू, असं म्हटलं पण यावर कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली नसल्याचं पाहायला मिळालं. 

नागपूर : आगामी लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (VidhanSabha) निवडणुका महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढवणार असल्याचा विश्वास मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केलाय. पण अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंनी थेट प्रतिक्रिया देणं टाळल्याचं देखील यावेळी निदर्शनास आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगीमी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या जागाही आम्ही लढवू असं म्हटलं. दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नसल्याचं पाहायला मिळालं. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अध्यक्षतेत शासकीय वैद्यकीय रुग्णालय  आणि  महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे नागपुरात दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे  गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी देखील मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत. पण मुख्यमंत्री शिंदे यांना नागपुरात पोहचण्यास बराच उशीर झाला. त्यातच  तिकडे राष्ट्रपतींचा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचा कार्यक्रम सुरू ही झाला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे ष्ट्रपतींच्या कार्यक्रमात पोहोचू शकतील याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. म्हणून मुख्यमंत्री शिंदे विमानतळावर उतरल्यावर तातडीने कार्यक्रमाच्या दिशेने रवाना झाले. 

त्याच अनुषंगाने अजित पवारांचे भाष्य - मुख्यमंत्री शिंदे

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून लढवणार आहोत. तसेच लोकसभेत राज्यातून 45 जागा जिंकून देणार आहोत.  एकजुटीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभेची निवडणूक आम्ही लढू आणि त्याच्या अनुषंगाने अजितदादांनी भाष्य केलं आहे. पुढच्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणून मिळूनच लढू. 2024 मधील विधानसभा निवडणूक ही महायुती मिळूनच लढेल, असं म्हणत अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया दिली नसल्याचं पाहायला मिळालं. 

अजित पवारांनी काय म्हटलं ? 

"आपल्याकडे असणाऱ्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणार आहोतच. परंतु इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला  जागा वाटप करता येईल" असं अजित पवार म्हणाले. 

 

हेही वाचा :

मोठी बातमी! महायुतीतल्या बारामती, सातारा, रायगड, शिरूरच्या जागा अजित पवार गट लढवणार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
Embed widget